शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नागरिकांनो, पुन्हा सात दिवस धीर धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:00 AM

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाचा आढावा तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता आढावा बैठकीत बोलत होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, नागरिकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्याची व्यवस्था करणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आवाहन : १४ एप्रिलपर्यंत फक्त जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गात संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेक राज्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेकडो नागरिक जिल्ह्यात अडकून आहेत. या सर्वांना घरी जायची घाई असली तरी १४ एप्रिलपर्यंत संयम बाळगावा. त्यानंतर आवश्यक व्यवस्था केली जाईल. शासन यासाठी प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही राज्याचे मदत व पूनर्वसनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाचा आढावा तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता आढावा बैठकीत बोलत होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, नागरिकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्याची व्यवस्था करणार आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने नियोजन सुरू केले. आहे. आरोग्याच्या तपासणी करताना अन्य नागरिकांना धोका होणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत नागरिकांची उत्तम काळजी घ्यावी, त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. अन्य राज्यात अडकून पडलेल्या नागरिकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे. त्या सर्वांनी त्याच ठिकाणी संयमाने राहण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयातील यंत्रणेची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षालाही भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व आरोग्य प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.टगाला येथे ग्रामसुरक्षा दल गठितकोरपना : तेलंगाना राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात कोरोनाचे १० पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. सदर राज्याची सीमा टागाला गावाला लागून असल्याने बाहेरील कुणीही व्यक्ती गावात येऊ नये, याठी खबरदारी म्हणून ग्रामसुरक्षा दल गठित झाली. चन्नईचे सरपंच अरुण मडावी, ग्रामरोजगार सेवक अशोक तोडसाम यांनी मार्गदर्शन केले. समितीच्या अध्यक्षपदी भीमा कोडापे, उपाध्यक्ष भीमबाई नायकुडे, सचिव भीमराव मडावी तर सदस्य पोलीस पाटील कोडापे, कानू पाटील, श्रीराम टेकाम, वनिता कोठारे, मंजू टेकाम आदींचा समावेश आहे.साडेपाचशे व्यक्तींचे होम क्वारंटाईन पूर्णघुग्घुस : लॉकडाऊनदरम्यान घुग्घुस परिसरात बाहेरून आलेल्या ६०३ व्यक्तींना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूने होम क्वारंटाईन केले होते. त्यापैकी ५५० जणांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले. उर्वरित ५३ व्यक्ती अजूनही होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सुटका झालेल्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. वाकडकर यांनी दिला आहे.घरातच उत्सव साजरा कराएप्रिल महिन्यात सण व उत्सव एकत्र आले आहेत. सर्वधर्मीयांच्या सण-उत्सवाचा यामध्ये सहभाग असतो. मात्र ही वेळ प्रत्येकाच्या घरातील ज्येष्ठ नागरिक, मुले व आपल्या प्रियजनांची काळजी घेण्याची आहे. आरोग्याला धोका पोहोचणार नाही, यासाठी हनुमान जयंतीपासून शब-ए-बडीरात, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, बुद्ध पौर्णिमा आदी सण घरीच साजरी करण्याचे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.जिल्ह्यात एकही पॉझिटीव्ह नाहीजिल्ह्यामध्ये सात एप्रिलपर्यंत एकही रूग्ण पॉझिटीव्ह नाही ही अतिशय चांगली बाब आहे. विदेशातून आलेल्या २०४ नागरिकांची तपासणी झाली. ते सर्व निगेटीव्ह आहेत. सोमवारी एक व्यक्ती नागपूर येथे विदेशातून आला. तिथे आरोग्य तपासणी सुरू झाली. हजरत निजामुद्दीन येथून आलेले सर्व व नागरिक निगेटीव्ह असल्याचेही ना. वडेट्टीवार यांनी आढावा बैठकीत सांगितले.धान्य व तपासणी किट मिळणारजिल्ह्यातील केसरी कार्डधारकांनाही सरकारी धान्य दुकानातून धान्याचे वाटप केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. याशिवाय जिल्ह्याला पुरेसे तपासणी कीट मिळणार आहेत. प्रत्येकाची तपासणी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नागरिकांनी मदत करण्याचे आवाहनही यावेळी केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस