शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वाटमारी करणारी टोळी गजाआड

By admin | Updated: April 13, 2016 01:18 IST

येथील एका व्यापाऱ्यांच्या दिवाणजीला रस्त्यावर मोटारसायकल आडवी करून लुटल्याची घटना शनिवारी घडली होती.

बल्लारपूर पोलिसांची कारवाई : चार लाखांचा मुद्देमाल जप्तबल्लारपूर : येथील एका व्यापाऱ्यांच्या दिवाणजीला रस्त्यावर मोटारसायकल आडवी करून लुटल्याची घटना शनिवारी घडली होती. लुटारूंनी दिवाणजीकडील वसुलीचे पाच लाख ५० हजार रुपये असलेली बॅग जबरीने हिसकावून पळ काढला होता. याची तक्रार बल्लारपूर पोलीस ठाण्यात रविवारी करण्यात आली. या घटनेमुळे व्यापारीवर्गात खळबळ माजली. बल्लारपूर पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त करुन वाटमारी करणाऱ्या टोळीला गजाआड करुन चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.सुनील मनोहर जांभुळकर (३७), विशेष ऊर्फ विशु मोगली कोंडावार (२८) रा. दादाभाई नौरोजी वॉर्ड बल्लारपूर व सुनील तिरुपती सिमलावार (२१) रा. महाराणा प्रताप वॉर्ड बल्लारपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य दोन आरोपींची नावे अद्याप कळली नाहीत.येथील व्यापारी रामनारायण खंडेलवाल यांच्याकडे शेख शहादल हैद्दर शेख (५४) रा. कन्नमवार वॉर्ड बल्लारपूर हा दिवाणजी म्हणून कामाला होता. सदर व्यापाऱ्याची उधारी रक्कम वसुलीचे तो काम करायचा. शनिवारी शेख शहादत्त याने राजुरा, गडचांदूर विरुर व नांदाफाटा येथील व्यापाऱ्यांकडून उधारीची रक्कम वसुल केली. ५ लाख ५० हजार रुपये बँगेमध्ये भरुन तो राजुरामार्गाने बल्लारपूरकडे दुचाकी वाहनाने येत होता. वर्धा नदीचे पात्र ओलांडल्यानंतर या घटनेतील पाचही आरोपीने पाठलाग करुन त्याला अडविले. राजुरा ते बामणी (दुधोली) मार्गावर सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान त्याला मारहाण करुन रक्कम असलेली बॅग जबरीने जखमी करुन घटनास्थळावरुन पोबारा केला. या घटनेमुळे पोलीस प्रशासन चांगलेच हादरले. शेख शहादत्त यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला गती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हद गिरी यांनी तातडीने बैठक घेवून आरोपींना जेरबंद करण्याची येथील पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निर्देश दिले. येथील पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांनी तपासाची चक्रे फिरवली. अखेर पाच आरोपींना वाटमारी करण्याच्या गुन्ह्याखाली गजाआड करण्यात यश आहे. ही कारवाई उपनिरीक्षक विनोद बावणे, राजेश चुंचूवार, दिवाकर पवार, प्रभाकर जाधव, अमोल नवघरे, संजय पोन्दे, विलास निंबाळकर, सुभाष सिडाम यांच्या पथकाने केली. (शहर प्रतिनिधी)