शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

चक घोसरीवासीयांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र नळ योजना मंजूर केली. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ जानेवारी २०१९ रोजी या कामाचे ई- भूमीपूजन पार पडले होते. मात्र वर्षभराचा कालावधी होऊन कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे. चकघोसरी येथे रमाई घरकूल योजनेतंर्गत ६८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देनळयोजना कागदावरच : एक वर्षापूर्वी झाले होते ई-भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत चक घोसरी येथे दहा वर्षांपूर्वी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने भटकंती करावी लागत आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र नळ योजना मंजूर केली. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ जानेवारी २०१९ रोजी या कामाचे ई- भूमीपूजन पार पडले होते. मात्र वर्षभराचा कालावधी होऊन कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे. चकघोसरी येथे रमाई घरकूल योजनेतंर्गत ६८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. घरकुलाची कामे सुरू आहेत. या कामाकरिता पाण्याचा तुटवडा भासत आहे. या गावात चार विहिरी व हातपंप आहेत. मात्र काही विहिरींतील पाणी पिण्यायोग्य नाही. सध्या पाण्याची पातळी खालावली. काही हातपंप नादुरुस्त असल्याने महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हातपंपावर घाण पसरली आहे. चकघोसरी गावात अद्याप नळ योजना पूर्णत्वास आली नाही. १० वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरणतर्फे बोरचांदली व १९ गावांच्या योजनेत समावेश करून २० हजार लिटर क्षमतेची टाकी उभारली. ग्रामस्थांनी नळजोडणीही केली. मात्र पाणीपुरवठा सुरू करण्यात प्रशासनाला अजुनही यश आले नाही. गावातील जलस्त्रोत आटल्याने गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहे. सध्या तापमानात वाढ होत असल्याने पाण्याची पातळी खालावणार आहे. त्यामुळे जि. प. ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने पाऊल उचलावे, अशी मागणी गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.जिल्हा परिषदेच्या नळ योजनेसंदर्भातील माहिती पाणी पुरवठा विभागाकडून घेण्यात येईल. त्यानंतर जलव्यवस्थापन व स्थायी समितीची बैठक आयोजित करून ही समस्या तात्काळ काढण्यात येईल.- संध्या गुरनुले, जि.प. अध्यक्ष चंद्रपूर

टॅग्स :Waterपाणी