वराेऱ्यात मद्यपी तरुणांचा राडा; कारचालकाला नाहक मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 11:05 IST2021-12-08T10:50:42+5:302021-12-08T11:05:00+5:30

वरोऱ्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दारू ढोसून फुल्ल झालेल्या दोन तरुणांनी विनाकारण एका कारचालकाला मारहाण करत राडा केला. पोलिसांनी या दोन्ही दारुड्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

charges file against two drunk people for Unnecessary beating of a person | वराेऱ्यात मद्यपी तरुणांचा राडा; कारचालकाला नाहक मारहाण

वराेऱ्यात मद्यपी तरुणांचा राडा; कारचालकाला नाहक मारहाण

ठळक मुद्देकारला धक्का लागल्यावरून वाद उफाळलाआनंदवन चौकातील घटना

चंद्रपूर : बीअर बारमध्ये दाेन तरुणांनी यथेच्छ दारू ढोसली. त्यानंतर बाहेर निघून कार मागे घेताना दुसऱ्या कारला धडक दिली, वरुन स्वत:च भडकले आणि कारमधून उतरून दुसऱ्या कारच्या चालकाला मारहाण करीत राडा केला. यावरून बीअर बार परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 

ही घटना वरोरा येथे मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. वणी येथील दोन तरुण कारने वरोरा येथील आनंदवन चौकातील बारमध्ये दारू पिण्यासाठी आले होते. यथेच्छ दारू ढोसल्यानंतर ते परत जाण्यासाठी कारमध्ये बसले. कार रिव्हर्स घेत असताना व्यक्ती आपल्या कारने तिथे आली. अशातच रिव्हर्स घेत असलेल्या कारची त्या व्यक्तीच्या कारला डॅश लागली. ती व्यक्ती काहीही तक्रार करीत नसतानाही मद्यपी तरुण त्या व्यक्तीवर चालून गेले.

आता आपल्याला मारहाण होईल या भीतीने ती व्यक्ती तिथून बीअर बारच्या दिशेने धावत गेली. यानंतर बारमध्ये आलेल्या लोकांनी हे दृश्य बघताच एकच गर्दी केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर हे प्रकरण वरोरा पोलिसात गेले. या प्रकरणी त्या दोन्ही तरुणांविरुद्ध वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरोराचे सहायक पोलीस निरीक्षक किटे यांनी दिली.

Web Title: charges file against two drunk people for Unnecessary beating of a person