शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या यादीत फेरफार; प्रदेशाध्यक्षांनी दिलेली चंद्रपूरची उमेदवार यादी डावलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:52 IST

Chandrapur : नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर भाजपमध्ये सुरू झालेल्या भूकंपाचे धक्के आता थेट महानगरपालिका निवडणुकीत उमटले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर भाजपमध्ये सुरू झालेल्या भूकंपाचे धक्के आता थेट महानगरपालिका निवडणुकीत उमटले आहेत. मनपा निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्षांच्या स्वाक्षरीने जाहीर झालेल्या अंतिम उमेदवार यादीला धुडकावून लावत मनमानी पद्धतीने उमेदवारी वाटप केल्याचा ठपका ठेवत भाजप शहर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोटुवार यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करत त्यांना तात्काळ पदमुक्त करण्यात आले. या कारवाईमुळे चंद्रपूर भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

कासनगोड्डवार हे आमदार किशोर जोरगेवार यांचे खंदे समर्थक मानले जात असल्याने या कारवाईकडे जोरगेवार गटाला दिलेला थेट राजकीय झटका म्हणून पाहिले जात आहे. या पत्राची प्रत कासनगोटुवार यांच्यासह विदर्भ विभाग संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या ६६ जागांपैकी ४ जागा मित्रपक्षांसाठी सोडून भाजपने उर्वरित ६२ जागांवरील उमेदवारांची अंतिम यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली होती. ही यादी शहर जिल्हाध्यक्ष या नात्याने कासनगोट्टवार यांच्याकडे अधिकृतरीत्या पाठविण्यात आली होती, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

नागपुरात दोन दिवस झालेल्या वादळी बैठकीनंतर चंद्रपूर पालिकेसाठी उमेदवारांची यादी प्रदेश नेतृत्वाकडे पाठविण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अंतिम यादी म्हणून ती जाहीरही केली. निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी या यादीतून तब्बल १४ उमेदवारांची नावे परस्पर वगळल्याचा आरोप पक्षांतर्गत पातळीवर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष,पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ प्रदेश नेत्यांनी ठरवलेली यादी बाजूला ठेवून मर्जीतील आणि विश्वासातील उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याचे आरोप झाले. परिणामी पक्षाला बंडखोरीचे वातावरण निर्माण झाल्याची बाब पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मनपा निवडणुकीच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर झालेल्या या घडामोडींमुळे भाजपची संघटनात्मक प्रतिमा डागाळली असून, याचा सर्वाधिक फटका आमदार किशोर जोरगेवार यांना बसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

पद रिक्त, प्रभार नाही

प्रदेशाध्यक्षांच्या यादीतील उमेदवार बदलण्याच्या प्रकारामुळे भाजपमध्ये बंडखोरीचे वातावरण निर्माण झाल्याची बाब थेट पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आली. परिणामी ३१ डिसेंबर रोजी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने कासनगोडुवार यांच्यावर पदमुक्तीची कारवाई करण्यात आली. मात्र, त्यांच्या जागी कुणाला प्रभार देण्यात आला, याचा उल्लेख पत्रात नसल्याने संभ्रम कायम आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP List Altered: State President's Chandrapur Candidate List Overruled.

Web Summary : Chandrapur BJP President Subhash Kasangotwar was removed for allegedly altering the candidate list approved by the state president for the municipal elections. This action, linked to MLA Kishore Jorgewar's faction, has sparked internal rebellion and organizational damage within the party, impacting Jorgewar.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026BJPभाजपा