चंद्रपूर जिल्ह्यात मूल बसस्थानकावर बसखाली दबून महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 09:58 IST2020-02-10T09:58:40+5:302020-02-10T09:58:57+5:30
चंद्रपूरला जाण्यासाठी मूल बस स्थानकावर उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावरून बस गेल्याने ती जागीच ठार झाली.

चंद्रपूर जिल्ह्यात मूल बसस्थानकावर बसखाली दबून महिला ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरला जाण्यासाठी मूल बस स्थानकावर उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावरून बस गेल्याने ती जागीच ठार झाली. लता प्रकाश वट्टमवार वय 62 वर्ष रा. मूल असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी 7.30 वाजता घडली.
चंद्रपूरला जाण्यासाठी प्रकाश वट्टमवार व त्यांची पत्नी लता वट्टमवार हे सोमवारी सकाळी 7.30 वाजता मूल येथील बस स्थानकावर आले. बसची वाट बघत असताना बस क्र. 40 ८ 5258 ही बस तिच्या अंगावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. तिच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मूल पोलिसांनी पंचनामा करीत आहेत.