Chandrapur: दुसऱ्या वर्गातील निर्भयची राज्य स्पर्धेसाठी झाली निवड

By साईनाथ कुचनकार | Updated: October 3, 2023 15:22 IST2023-10-03T15:21:51+5:302023-10-03T15:22:19+5:30

Chandrapur: चंद्रपूर येथील माऊंट कान्व्हेंट हायस्कूलमधील दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी तथा तुकूम येथील रहिवासी निर्भय उर्फ लकी दिवाकर अलोणे याची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी धावणे तसेच लांब उडी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Chandrapur: Class II Nirbhay selected for state competition | Chandrapur: दुसऱ्या वर्गातील निर्भयची राज्य स्पर्धेसाठी झाली निवड

Chandrapur: दुसऱ्या वर्गातील निर्भयची राज्य स्पर्धेसाठी झाली निवड

- साईनाथ कुचनकार 

चंद्रपूर - येथील माऊंट कान्व्हेंट हायस्कूलमधील दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी तथा तुकूम येथील रहिवासी निर्भय उर्फ लकी दिवाकर अलोणे याची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी धावणे तसेच लांब उडी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल विसापूर येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ८ वर्षे वयोगटामध्ये ५०० मीटर धावणेमध्ये प्रथम लक्रमांक पटकावून सुवर्ण पदक मिळविले. तसेच लांब उडी स्पर्धेत २.७४ मीटर उडी मारून द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक मिळविले. यामुळे राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत निवड झाली आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई लिनाश्री, वडील दिवाकर अलोणे, प्रशिक्षक रोशन भुजाडे यांना दिले

Web Title: Chandrapur: Class II Nirbhay selected for state competition