यु डायस प्रणालीत चंद्रपूर राज्यात अव्वल; अमरावती, नागपूर, पूणे, लातूर पडले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 03:50 PM2021-05-21T15:50:02+5:302021-05-21T15:51:01+5:30

विशेष म्हणजे, शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेले पूणे, नागपूर, अमरावती आदी जिल्हे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरेच मागे पडले आहे.

Chandrapur: Chandrapur tops state in U dice system; Amravati, Nagpur, Pune, Latur fell behind | यु डायस प्रणालीत चंद्रपूर राज्यात अव्वल; अमरावती, नागपूर, पूणे, लातूर पडले मागे

यु डायस प्रणालीत चंद्रपूर राज्यात अव्वल; अमरावती, नागपूर, पूणे, लातूर पडले मागे

Next

चंद्रपूर - बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी तसेच इतर सुविधा मिळविण्यासाठी प्रत्येक शाळांना केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या असलेल्या यु डायसमध्ये माहिती भरावी लागते. या प्रणालीमध्ये अद्यावत माहिती भरून चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात प्रथम तर गोंदिया, भंडारा जि्ल्ह्याने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे, शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेले पूणे, नागपूर, अमरावती आदी जिल्हे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरेच मागे पडले आहे.

राज्यातील शाळांची माहिती यामध्ये विद्यार्थी स्थंख्या, दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, भौतिक व मूलभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण, वर्ग खोल्या, खेळाचे मैदान, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी यासह शाळांची गुणवत्ता वाढविण्याकरिता पहिली ते १२ वी पर्यंतच्या प्रत्येक शाळांची माहिती यु डायसवर ऑनलाईन भरावी लागते. यासाठी राज्यभरातील १ लाख १० हजार ५१४ शाळांनी माहिती भरणे सुरु केले आहे. यातील ३ हजार १७० शाळांनी अद्यापही नोंदणीच केली नाही. तर ४ हजार २२१ शाळांनी माहिती भरण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान,

चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार ५०१ शाळा असून यातील प्रत्येक शाळांनी माहिती भरली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी राहूल कर्डिले यांचे वेळोवेळी मार्गदर्शन तसेच या कामाकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केल्यामुळेच जिल्हा राज्यात प्रथम आल्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक उल्हास नरड, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी सांगितले.

हे जिल्हा पडले मागे
राज्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले काही जिल्हे यु -डायस प्रणालीमध्ये माहिती भरण्यास मागे पडले आहे. यामध्ये पुणे, नागपूर, अमरावती, अहमदनगर, यवतमाळ, पालघर, मुंबई, जालना, वाशिम,लातूर, बिड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

पहिल्या पाचमध्ये असलेले जिल्हे
भंडारा दुसऱ्या, गोंदिया तिसऱ्या, जवळगाव चौथ्या तर नंदूरबार जिल्हा पाचव्या स्थानावर आहे.
 

Web Title: Chandrapur: Chandrapur tops state in U dice system; Amravati, Nagpur, Pune, Latur fell behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.