शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

चंद्रपुरात २६८ किलो नकली बर्फी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:55 IST

अन्न आणि औषध विभागाच्या पथकाने आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या नकली बर्फीचा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल २६८ किलो नकली बर्फी जप्त करण्यात आली. या कारवाईने नकली बर्फी विकून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मिष्ठान्न विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात असून अशा प्रकाराने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : अन्न व औषध विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अन्न आणि औषध विभागाच्या पथकाने आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या नकली बर्फीचा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल २६८ किलो नकली बर्फी जप्त करण्यात आली. या कारवाईने नकली बर्फी विकून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मिष्ठान्न विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात असून अशा प्रकाराने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.चंद्रपूर शहरातील सपना टॉकीजजवळ मोठ्या प्रमाणात नकली बर्फीचा साठा असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. याआधारे चौकशी केली असता डीएनआर कुरिअर आॅफिससमोर एका गोदामाबाहेर बर्फी ठेवून असल्याचे निदर्शनास आले. ही बर्फी ठेवण्यासाठी विशेष रेफ्रिजरेटरची आवशकता असते. परंतु ही बर्फी उघडयावरच ठेवलेली होती. चौकशीत पुरवठादाराकडे अन्न व औषध विभागाचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. ही बर्फी सावलराम झोइताराम चौधरी याची असून त्याने गुजरातमधून मागविल्याचे सांगितले. या गोरखधंद्यात आणखी काही जणांची नावे पुढे आल्याचे समजते. पथकाने जप्त केलेली २६८ किलो नकली बर्फी जप्त करून नष्ट केली.मिठाईच्या प्रकारात बर्फीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने अन्य ठिकाणाहून याचा मोठा साठा मागविला जातो. त्यात अनेकदा भेसळ असते. दूध पावडर, डालडा आणि निकृष्ठ दर्जाचे पदार्थ टाकून ही नकली बर्फी तयार केली जाते. मानवी आरोग्यास ती अत्यंत हानिकारक असते. मात्र, नफा कमविण्यासाठी नकली बर्फी मोठ्या प्रमाणात बाहेरुन मागविली जाते. त्यानंतर ती जिल्ह्यातील काही निवडक मिठाई दुकानदारांना पुरविली जाते. यासाठी एक मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रीय आहे. अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पथकाला यश आले आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली केकारे, उमप यांनी केली. अन्न आणि औषध विभागाची ही मोठी कारवाई मानली जात असून या कारवाईमुळे जिल्ह्यात नकली बर्फीचा व्यवसाय करणाºया रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.