शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

सावधान : रुग्णसंख्या चढतीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:27 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता कोरोनाची परिस्थिती आरोग्य विभागाच्याही हाताबाहेर जात आहे. अनेकांना ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता कोरोनाची परिस्थिती आरोग्य विभागाच्याही हाताबाहेर जात आहे. अनेकांना खाटा उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना उपचारापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. दरम्यान, सोमवारी ९७४ नव्या रुग्णांची भर पडली असून १० जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे आजपर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता ५०२ वर पोहचली आहे. तर बांधितांची संख्या ३४ हजार ५०३ वर गेली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेणे सध्यातरी अत्यंत गरजेचे आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आदी जिल्ह्यांमध्येही कोरोना उद्रेक सुरूच आहे. रुग्णसंख्या तसेच मृत्यूदर झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्याचीही अवस्था सध्या बिकट झाली आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालये फुल्ल झाल्यामुळे बेड मिळणे कठीण झाले आहे. अनेकांना बेड मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागत असून काहींना घरीच राहून औषधोपचार घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ८८८ कोरोना रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर खासगी, सरकारी तसेच गृहविलगीकरण करून उपचार सुरू आहेत. यामध्ये सोमवारी एकाच दिवशी ९७४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३४ हजार ५० वर जाऊन पोहचली आहे. नागरिकांनी आणखी बेकिकिरी केली तर ही रुग्णसंख्या आणखी झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात मागील २४ तासात ३५४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत ३ लाख ४ हजार ४९८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ६५ हजार १३५ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

बाॅक्स

सोमवारचे मृत्यू

आंबेनेरी तालुका चिमूर येथील ५६ वर्षीय पुरुष, सोनेगाव बु. ता. चिमूर येथील ६५ वर्षीय महिला, पिपर्डा ता. चिमूर येथील ५० वर्षीय महिला, चंद्रपूर शहरातील सरकारनगर येथील ३८ वर्षीय महिला, भिवापूर बंगाली कॉलनी येथील ५८ वर्षीय महिला व जटपुरा गेट येथील ६२ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील ४५ वर्षीय पुरुष, गुरुमाऊली नगर वरोरा येथील ७० वर्षीय महिला, सलीमनगर, वरोरा येथील ६३ वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

बाॅक्स

सोमवारचे बाधित

चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र ३०९

चंद्रपूर तालुका ५८

बल्लारपूर १०

भद्रावती १०८

ब्रह्मपुरी १६

नागभीड २६

सिंदेवाही ०६

मूल २१

सावली १४

गोंडपिपरी १०

राजुरा १५

चिमूर १४२

वरोरा २०५

कोरपना २६