पाहुणी म्हणून आलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; गोंडपिपरी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 04:08 PM2022-07-11T16:08:33+5:302022-07-11T16:08:44+5:30

चिमुकली सानू घरासमोरील नालीत पाय घसरून पडली. नाली तुडुंब भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर नालीलगत असलेल्या छोटा रपटा असणाऱ्या पुलाच्या सिमेंट पाइपमध्ये जाऊन अडकली.

Carried in the drain water and stuck in the cement pipe; The unfortunate death of three-year-old Chimukali | पाहुणी म्हणून आलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; गोंडपिपरी तालुक्यातील घटना

पाहुणी म्हणून आलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; गोंडपिपरी तालुक्यातील घटना

googlenewsNext

वढोली (चंद्रपूर) : आई-वडिलांसोबत भेटी-गाठीकरिता नातेवाइकाकडे आलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा रपट्याच्या पाईपमध्ये अडकून मृत्यू झाला. ही घटना रविवारी गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे घडली.

सानू मंगेश चुनारकर (३, रा. चिमडा, ता. मूल, जि. चंद्रपूर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी ती विठ्ठलवाडा येथे नातेवाईकाकडे आली होती. दरम्यान, मुसळधार पाऊस सुरू असल्याने ती आईसोबत विठ्ठलवाडा येथे थांबली. मुसळधार पावसाने नदी, नाले, गावातील नाली, छोटे पूल पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच सानू सकाळी ९ वाजताच्या सुमारास घरासमोरील नालीत पाय घसरून पडली. नाली तुडुंब भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर नालीलगत असलेल्या छोटा रपटा असणाऱ्या पुलाच्या सिमेंट पाइपमध्ये जाऊन अडकली.

घरच्यांनी आरडाओरड करताच तिला वाचविण्यासाठी दोन तरुण नालीत उतरले. तिला पुलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. १५ मिनिटांनी तिला बाहेर काढण्यात यश आले. मात्र बराच वेळ पुलाखालील पाण्यात अडकून राहिल्याने बेशुद्ध पडली. लागलीच गावातील एका ऑटोने तिला ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Web Title: Carried in the drain water and stuck in the cement pipe; The unfortunate death of three-year-old Chimukali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.