शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सरळसेवा भरती प्रवेश शुल्क रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

शासन रोजगारातून मनुष्यबळ तसेच युवकांच्या श्रम, कौशल्य, उत्पादन आणि उत्पन्नाची सांगड घालण्याचे अनेक प्रयत्न करत आहे. आत्मनिर्भर व विकासाकडे वाटचाल करण्यासाठी रोजगाराचा प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. पण, महाराष्ट्रातील सरळसेवा भरती प्रक्रियेत वाईट अनुभव विद्यार्थ्यांना पाहायला मिळत आहेत. मेगाभरतीची परीक्षा शुल्क २५० ते ५०० रूपये ठेवण्यात आले.

ठळक मुद्देधनगर समाज महासंघ : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने सरळ सेवा नोकर भरतीसाठी परीक्षा शुल्कावर मनमानी जीएसटी आकारत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना मानसिक, आर्थिक त्रास होत आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी, यासाठी हा शुल्क रद्द करण्याची मागणी धनगर समाज महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.शासन रोजगारातून मनुष्यबळ तसेच युवकांच्या श्रम, कौशल्य, उत्पादन आणि उत्पन्नाची सांगड घालण्याचे अनेक प्रयत्न करत आहे. आत्मनिर्भर व विकासाकडे वाटचाल करण्यासाठी रोजगाराचा प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. पण, महाराष्ट्रातील सरळसेवा भरती प्रक्रियेत वाईट अनुभव विद्यार्थ्यांना पाहायला मिळत आहेत. मेगाभरतीची परीक्षा शुल्क २५० ते ५०० रूपये ठेवण्यात आले. सध्या सुरू असलेल्या महानिर्मिती महावितरण व इतर काही विभागात भरती प्रवेशात राज्य शासन जीएसटी लावत आहे. त्यामुळे परीक्षा शुल्क ३०० ते ५०० ्ररूपयांपर्यंत पोहचले आहे. राज्य आणि केंद्र सरकार जीएसटीद्वारे १२.५ टक्के आणि १२.५ टक्के म्हणजे एकूण २५ टक्के जीएसटी विद्यार्थ्यांकडून गोळा करीत आहे. यातून विद्यार्थी व पालकांना आर्थिक त्रास होत आहे, असा आरोप संघटनेने केला.विद्यार्थी जीवनात विद्यार्थी शिक्षणच घेतात. शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो म्हणजे तो बेरोजगार असतो. त्यात एवढे शुल्क आणि जीएसटी लावगून शासनाकडून विद्यार्थी व त्यांच्या पालकांवर करणे चुकीचे आहे. सरळ सेवा परीक्षेतील म्हणजे स्पर्धा परीक्षेचे शुल्क कमी करावे व जीएसटी पूर्णपणे रद्द करून विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास कमी करावा, अशी मागणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघचे जिल्हाध्यक्ष योगीराज बापुराव उगे जिल्हा उपाध्यक्ष गुलाब चिडे, मल्हार सेनाचे जिल्हाध्यक्ष गौरव नवले, पपीता येडे, रेखा मोंढे, रमेश बुचे, डॉ.नामदेव ढवळे, नंदकिशोर शेरकी आदींनी निवेदनातून केली आहे.