चंद्रपूर जिल्ह्यात सावंगी मेघे रुग्णालयाची बस उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 14:59 IST2018-06-27T14:57:20+5:302018-06-27T14:59:18+5:30

वर्धा येथील सावंगी मेघे रुग्णालयात १५ रूग्णांना घेऊन जाणारी बस उलटल्याची घटना बुधवारी सकाळी चिकणी गावानजीक घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.

The bus of Savangi Meghhe Hospital has fall down in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात सावंगी मेघे रुग्णालयाची बस उलटली

चंद्रपूर जिल्ह्यात सावंगी मेघे रुग्णालयाची बस उलटली

ठळक मुद्देचिकणी जवळील घटना१५ रूग्ण सुखरूप

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर : वर्धा येथील सावंगी मेघे रुग्णालयात १५ रूग्णांना घेऊन जाणारी बस उलटल्याची घटना बुधवारी सकाळी चिकणी गावानजीक घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.
सावंगी मेघे रूग्णालयाची रूग्णवाहिका वरोरा येथील रूग्णांना दररोज मोफत घेवून जाते. शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे व दुर्धर आजारावर अत्यल्प खर्चात उपचार व्हावे, याकरिता सावंगी मेघे रुग्णालयाची मागील काही महिन्यांपासून वरोरा ते वर्धा सावंगी व सावंगी ते वरोरा अशी मोफत बससेवा सुरू आहे.
ही बस रूग्णांना घेऊन जाताना वरोरा तालुक्यातील चिकणी गावानजीक उलटली. यावेळी बसमध्ये १५ रुग्ण होते. परंतु कुणालाही दुखापत झाली नाही.

Web Title: The bus of Savangi Meghhe Hospital has fall down in Chandrapur district

टॅग्स :Accidentअपघात