५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट काँक्रिट प्लॅटफॉर्म बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:24+5:302021-04-25T04:28:24+5:30

चंद्रपूर : चंद्रपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जाते. पूर्वी येथे एकाच वेळी ...

Build a cement concrete platform with a capacity of 50 to 60 carcasses | ५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट काँक्रिट प्लॅटफॉर्म बांधा

५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट काँक्रिट प्लॅटफॉर्म बांधा

चंद्रपूर : चंद्रपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जाते. पूर्वी येथे एकाच वेळी सात ते आठ मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था होती. मात्र, आता अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे येथे ५० ते ६० मृतदेह ठेवता येतील इतक्या क्षमतेचे सिमेंट काँक्रीट प्लॅटफॉर्म तातडीने बांधण्याचे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी बांधकाम विभागाला दिले.

महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी शनिवारी सकाळी शिव मोक्षधाम स्मशानभूमीची पाहणी केली. या भेटीदरम्यान महापौरांसोबत स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार, उपायुक्त विशाल वाघ, शहर अभियंता महेश बारई, शिव मोक्षधाम समितीचे अध्यक्ष अजय वैरागडे, सचिव श्याम धोपटे आदी उपस्थित होते.

महापालिका हद्दीत काही दिवसांपासून कोरोनाच्या मृत्यूसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे स्मशानभूमीत शवदाहिनीऐवजी लाकडांवर अंत्यविधी करण्यात येत आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून मृत्यूचा आकडा वाढू लागल्याने नदीच्या काठावर व्यवस्था करण्यात आली. स्मशानभूमीवर मृतदेह जाळण्यासाठी वेटिंग करावे लागत आहे. ही गैरसोय लक्षात येताच महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी शनिवारी सकाळी स्मशानभूमीची तातडीने पाहणी केली. यावेळी त्यांनी शिव मोक्षधाम समितीचे पदाधिकारी, तेथील कर्मचारी आणि अंत्यसंस्कारासाठी सेवेत असलेल्या मनपाच्या कर्मचाऱ्यांशी महापौरांनी चर्चा केली.

स्मशानभूमीतील समस्या, अडचणी, गैरसोय आदींची आस्थेने विचारपूस केली. याशिवाय या भागात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, रात्री १०च्या आत सर्व अंत्यविधी पूर्ण करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.

Web Title: Build a cement concrete platform with a capacity of 50 to 60 carcasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.