लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, तसेच १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या मय्यत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ तात्काळ देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना ब्रह्मपुरीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सरकारविरोधी नारे देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.मागील अनेक दिवसांपासून जुन्या पेन्शन योजनेची मागणी सुरु आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मागण्या त्वरीत पूर्ण कराव्या, अन्यथा २० आॅगस्ट रोजी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षाणिक संप करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.निवेदन देणाºया शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष सतीश डांगे, तालुका उपाध्यक्ष प्रा. बालाजी दमकोंडवार, तालुका कार्याध्यक्ष प्रा. प्रशांत मत्ते यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
जुन्या पेन्शन योजनेसाठी ब्रह्मपुरीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:14 IST
१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, तसेच १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या मय्यत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ तात्काळ देण्यात यावा,
जुन्या पेन्शन योजनेसाठी ब्रह्मपुरीत आंदोलन
ठळक मुद्देसंडे अँकर । महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन