शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बदली प्रकरण: चौकशी अधिकारी बदलला

By admin | Updated: September 10, 2016 00:50 IST

बोगस शिक्षक बदली प्रकरणाचा तपास पीएसआय मुनगेलवार यांच्याकडून काढून टाकण्यात आला असून...

गडचिरोलीच्या ठाणेदारांकडे सूत्र : ‘त्या’ दोन मास्टर मार्इंड कर्मचाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरूगडचिरोली : बोगस शिक्षक बदली प्रकरणाचा तपास पीएसआय मुनगेलवार यांच्याकडून काढून टाकण्यात आला असून सदर तपास गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पुराणिक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील खरे सूत्रधार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू झाला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी २२० शिक्षकांच्या बोगस बदल्या २०१३ साली करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी तब्बल तीन वर्षानंतर जिल्हा परिषदेतील लिपीक रूपेश शेडमाके याला अटक केली. सध्या रूपेश शेडमाके हा न्यायालयीन कोठडीची हवा खात आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान या प्रकरणात त्यावेळी जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांची नावे सांगितली आहेत. या प्रकरणात गुंतून असलेल्या शिक्षकांनी सुध्दा याच दोघांची नावे सांगितले आहेत. सदर बोगस प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित दोन कर्मचाऱ्यांच्या बदल्या इतर तालुक्यामध्ये करण्यात आल्या होत्या. रूपेश शेडमाके याने आपले नाव तपासामध्ये सांगितले असल्याची कुणकुण माहित होताच हे दोघेही फरार झाले आहेत. या प्रकरणात हे दोघेच खरे मास्टर मार्इंड आहेत. रूपेश शेडमाकेच्या जबाबावरून पोलिसांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास बजाविले होते. मात्र आरोपी त्यापूर्वीच फरार झाले आहेत. मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून पोलीस संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत या दोन कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नाही. शिक्षक बोगस बदली प्रकरणातील हे दोघेच व्यक्ती खरे सूत्रधार असल्याने त्यांच्या अटकेनंतर बरीच माहिती समोर येणार आहे. सदर दोन कर्मचारी आणखी इतरही व्यक्तींची नावे सांगणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. रेल्वेसाठी जमीन अधिग्रहणाचे काम गडचिरोली : वडसा-गडचिरोली या ५२ किमी लांबीच्या बहूप्रलंबित रेल्वे मार्गाच्या जमीन अधिग्रहण कामाला वेग आला आहे. या रेल्वे मार्गासाठी वन, महसूल व खासगी शेतमालकांची जमीन लागणार आहे. ही जमीन मिळविण्याच्या दृष्टीकोणातून अलिकडेच गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर खासगी जमीन अधिग्रहण करण्याच्या दृष्टीकोणातून शेतकऱ्यांचे सातबारे तपासण्याचे काम महसूल विभागाने हाती घेतले आहे, अशी माहिती गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अशोक नेते यांनी दिली.वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी विद्यमान केंद्र सरकारने दोन अर्थसंकल्पात ८० लाख रूपयाचा निधी प्रतीवर्षी मंजूर केला आहे. त्यामुळे देसाईगंज रेल्वेस्थानकावर पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे काम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)तपासाला येणार गतीशिक्षक बोगस बदली प्रकरणाचा तपास यापूर्वी गडचिरोली ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक मुनगेलवार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र काही शिक्षक संघटनांनी मुनगेलवार यांच्याकडून तपास काढून घेण्याची विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी मुनगेलवार यांच्याकडून तपासाची सुत्रे काढून घेऊन तपास ठाणेदार विजय पुराणिक यांच्याकडे सोपविला आहे. तपासाला गती मिळण्याची शक्यता शिक्षक वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.