Coronavirus in Chandrapur; कोरोनाला रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या बोडदा गावाने घातले काटेरी कुंपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 20:25 IST2021-04-26T20:25:08+5:302021-04-26T20:25:29+5:30
Chandrapur news देशाच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील बोडदा या गावातील नागरिकांनी कंबर कसली आहे.

Coronavirus in Chandrapur; कोरोनाला रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या बोडदा गावाने घातले काटेरी कुंपण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: देशाच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील बोडदा या गावातील नागरिकांनी कंबर कसली आहे. त्यांनी गावाच्या वेशीवर काटेरी कुंपण लावून गावात कुणालाच प्रवेश नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य असून, दोन हजारांच्या आसपास गावांतील लोकसंख्या आहे. गावांमध्ये गावाच्या प्रवेशद्वारावरच झाडाचे काटेरी कुंपण तयार करण्यात आले आहे. या गावांमध्ये इतरत्र कोणत्याही बाहेर गावच्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येत आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कामे वगळता इतर गावचे व्यक्ती या गावांमध्ये दिसल्यास ग्रामपंचायतीद्वारे ५०० रुपये दंड आकारण्यात सुद्धा येत आहे. या गावाने घेतलेला हा निर्णय केलेली कृती इतर गावासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरते काय हे पाहणे महत्त्वाचे ठरते.