शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला सर्वात मोठा फटका! चंद्रपूर महापालिकेत होणार सत्तापालट?; काँग्रेसचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 18:46 IST

चंद्रपूर महापालिकेच्या ६६ जागांपैकी भाजपाला २३ जागा शिंदेसेनेला १ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या आहेत

चंद्रपूर - राज्यातील २९ महापालिकांचा निकाल हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. त्यात बहुतांश महापालिकेत भाजपाचं वर्चस्व सिद्ध झाले आहे. परंतु विदर्भातील चंद्रपूर महापालिकेत भाजपाची सत्ता उलथावून लावण्यात काँग्रेसला यश आले आहे. चंद्रपूर महापालिकेसाठी ५६.८९ टक्के मतदान झाले होते. त्यात १७ प्रभागातील ६६ नगरसेवकपदासाठी निवडणूक झाली. मात्र या निवडणुकीत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार, भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांना धक्का बसला आहे. याठिकाणी काँग्रेस आणि भाजपाच्या थेट लढाईत काँग्रेसने बाजी मारली आहे.

चंद्रपूर महापालिकेच्या ६६ जागांपैकी भाजपाला २३ जागा शिंदेसेनेला १ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या आहेत. या महापालिकेत काँग्रेस ३० जागांवर पुढे आहे तर उद्धव ठाकरेंचा पक्षही ६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे इतरांच्या मदतीने चंद्रपूरात काँग्रेस महापालिकेत सत्ता पालट करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. चंद्रपूर महापालिकेत पहिल्यांदाच उद्धवसेनेचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. 

पाच शहरात काँग्रेसचा महापौर - काँग्रेस

तर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो. जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांचा निर्धाराचा लढा या जोरावर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहे. पाच शहरात काँग्रेसचा महापौर तर ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ असे चित्र आहे अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संक्रातीच्या पर्वावर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. जेथे शक्य आहे तेथे स्वबळावर तर काही ठिकाणी आघाडी करून काँग्रेस पक्षाने वैचारिक व संघटनात्मक वाढीसाठी निवडणूक लढली. सत्ताधारी भाजपा महायुतीने पैशाचा प्रचंड वापर केला, बोगस मतदान झाले, कुठलीही तडजोड न करता भाजपाच्या बुलडोझरसमोर काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा राहिला. हा कार्यकर्त्यांचा विजय असून लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान आहे असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Major Blow to BJP: Congress Poised for Power in Chandrapur?

Web Summary : Congress gained ground in Chandrapur Municipal Corporation elections, potentially ousting BJP. Despite BJP's state dominance, Congress secured significant wins, leading to a possible power shift with support from other parties. Congress aims for mayoral positions in five cities.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६congressकाँग्रेसBJPभाजपाVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार