बिबट शिकार : १८ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:01:19+5:30
सावली वनपरिक्षेत्रातील व्यहाडखुर्द उपवनक्षेत्राच्या सिर्शी बिट कक्ष क्रमांक १५३४ (संरक्षित वन) साखरी माल येथे रानडुकराच्या शिकारीसाठी जाळे पसरविण्यात आले होते. मात्र, सदर जाळ्यात बिबट अडकला. त्यातून निघण्याच्या प्रयत्नात त्याचा फास आवळून मृत्यू झाला. सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांनी चंद्रपूरचे विभागीय वनाधिकारी सोनकुसरे यांना माहिती दिली होती.

बिबट शिकार : १८ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : रानडुकराची शिकार करण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सावली वनपरिक्षेत्रात घडली होती. या प्रकरणी वन विभागाने १८ जणांना अटक केली आहे.
भोजराज ठाकूर (३९), सुखदेव बांबोळे (५२), आकाश कुमरे (२२), नरेश भोयर (३०), सावजी उराडे (६३), श्रीधर गेडाम (३२), दशरथ गेडाम (६५), नकटू ठाकरे (६२), रमेश भोयर (४७), राजू भोयर (२८), प्रमोद भोयर (३१), किशोर ठाकूर (३०), सत्यवान गेडाम (३४), देवराव बांबोळे (४१) रा. सिरसी, तुळशिदास भोयर (४२), भाऊजी भोयर (४७), किशोर भोयर (३९), पुरुषोत्तम सोयाम (४६) रा. पेठगाव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सावली वनपरिक्षेत्रातील व्यहाडखुर्द उपवनक्षेत्राच्या सिर्शी बिट कक्ष क्रमांक १५३४ (संरक्षित वन) साखरी माल येथे रानडुकराच्या शिकारीसाठी जाळे पसरविण्यात आले होते. मात्र, सदर जाळ्यात बिबट अडकला. त्यातून निघण्याच्या प्रयत्नात त्याचा फास आवळून मृत्यू झाला. सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांनी चंद्रपूरचे विभागीय वनाधिकारी सोनकुसरे यांना माहिती दिली होती. पशुधन विकास अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार, डॉ. रोहिणी अरबाळ यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन केल्यानंतर मृत बिबट्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणाचा तपास विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांनी केला. यात तपासाची चक्रे वेगाने फिरवीत १८ जणांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सर्वांना अटक केली आहे. ही कारवाई क्षेत्र सहायक विनोद धुरवे, एन. डब्ल्यू. बुराडे, वनरक्षक आर. डी. गेडाम, विश्वास चौधरी, नागरगोजे, पाडवी, कडेल, नागरे आदींनी सहकार्य केले.