सावधान... आता डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 05:00 AM2021-09-25T05:00:00+5:302021-09-25T05:00:03+5:30

मागील काही दिवसांत साथरोगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अस्वच्छता, ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती यामुळे डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. मागील दोन महिन्यांत डेंग्यू रुग्णसंख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही रुग्ण आढळून आले. ऑगस्ट महिन्यात २४६  सप्टेंबरमध्ये ९४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरात १ हजार ६६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Beware ... now the dengue virus is also changing | सावधान... आता डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय

सावधान... आता डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत बनले असताना, आता डेंग्यूचाही व्हायरस बदलत असल्याचे दिसून येत आहे. अंगात ताप नसतानाही डेंग्यू पाॅझिटिव्ह आल्याची उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेसह सकस आहार, तसेच आरोग्याकडे अधिक लक्ष देऊन रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे.
मागील काही दिवसांत साथरोगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अस्वच्छता, ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती यामुळे डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. मागील दोन महिन्यांत डेंग्यू रुग्णसंख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही रुग्ण आढळून आले. ऑगस्ट महिन्यात २४६  सप्टेंबरमध्ये ९४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरात १ हजार ६६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यात ४५४ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले.
 

हे बदल काळजी वाढविणारे...

ताप  नसताना पाॅझिटिव्ह
ताप, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, खाज सुटणे, अशक्तपणा वाटणे ही डेंग्यूची लक्षणे असली तरी, लक्षणे दिसत नसतानासुद्धा डेंग्यूची चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह येत आहे.

प्लेटलेट्स कमी नाहीत तरी पाॅझिटिव्ह
डेंग्यूची लागण झाल्यानंतर साधारणत: बऱ्याच  रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होतात. मात्र काहींना या आजाराची लागण झाल्यानंतरही त्यांच्या प्लेटलेट्स कमी होत नसल्याचे डाॅक्टर आणि पॅथाॅलाॅजिस्ट तज्ज्ञांनी सांगितले. डेंग्यूचा २ टाईप हा प्रकार थोडा धोकादायक आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

१६६७ एकूण नमुने तपासणी  

डेंग्यूची लागण झाल्यानंतर प्लेटलेट्स कमी होणे गरजेचे नाही. बऱ्याच रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती ही चांगली असते. त्यामुळे अशा रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होत नाहीत. प्लेटलेट्स चांगल्या असणाऱ्यांचाही डेंग्यूचा अहवाल पाॅझिटिव्ह येऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी दुर्लक्ष न करता डॅाक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो औषधोपचार करणे आवश्यक आहे.
- डाॅ. राकेश गावतुरे
पॅथाॅलाॅजिस्ट, चंद्रपूर

 

Web Title: Beware ... now the dengue virus is also changing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app