एक लाख रुपयांची ऑनलाइन लॉटरी लागली आहे. त्यासंदर्भात तुमच्या बँक खात्याची माहिती द्यावी, असे ई-मेल सायबर चोरटे अनेकांना पाठवितात. पैशांच्या हव्यासापोटी अनेकजण कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता, खात्यासंदर्भात संपूर्ण खासगी माहिती देतात. त्यानंतर सायबर चोरटे खात्यातील संपूर्ण रक्कम गहाळ करतात. असे अनेक प्रकार सगळीकडे उघडकीस येत आहेत. त्यामुळे अशा चोरट्यांपासून सावधान रहावे, कोणालाही आपल्या खात्याची वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
बॉक्स
फिशिंग ई-मेल
फिशिंग इ-मेल एक फ्रॉड ई-मेल मेसेज आहे. फिशिंग मेल अगदी खऱ्या मेलप्रमाणे दिसतात. त्यामुळे असे मेल एखाद्या कंपनीनेच पाठवले आहेत, असे वाटते. फिशिंग इ-मेलमधून युजरकडे त्यांचे पर्सनल डिटेल्स, फायनान्शिअल माहिती मागितली जाते. अशा ई-मेलवर माहिती गेल्यास आर्थिक नुकसानासह इतरही डेटा चोरीला जाण्याचा धोका आहे.
बॉक्स
ही घ्या काळजी
अपरिचित ई-मेल आल्यास सतर्कता बाळगावी. लॉटरी लागल्याचे ई-मेल वा संदेश आल्यास ते तातडीने डिलीट करावे. जर संदेश उघडून पाहिला तरी त्यातील कोणतीही लिंक ओपन करू नका. तसेच कोणालाही बँक खात्यासंदर्भात माहिती देऊ नये. तसेच मोबाइलवर कुठलाही ओटीपी मागितल्यास देऊ नये.
बॉक्स
वेबसाईटवरची सुरुवात एचटीटीपीएसपासून झाली का?
एचटीटीपीएस आपल्या वेबसाईटची अखंडता आणि आपल्या वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षा यांचे संरक्षण करते. याव्यतिरिक्त वेब प्लॅटफॅार्मची नवीन शक्तिशाली वैशिष्ट्येदेखील एचटीटीपीएस वापरणाऱ्या साईटपुरती मर्यादित आहेत. त्यामुळे आपणाला आलेल्या एचटीटीपीएसवरून आले आहे का? याची शहानिशा करावी.
बॉक्स
लॉटरी लागल्याचे दाखवतात आमिष
१) ई-मेलवर लॉटरी लागली असा मेल पाठविण्यात येतो. त्यानंतर खाते नंबर मागितला जातो. तसेच प्रोसिजर करण्यासाठी विशिष्ट प्रकारची माहिती पाहिजे असे सांगून आपली संपूर्ण खासगी माहिती मागवून खात्यातून पैसे लंपास केले जातात.
२) ऑनलाइन क्वीजमध्ये तुम्हाला चारचाकी वाहन लागले आहे. असा मेल आला. त्यासाठी बँक खात्याची माहिती मागविण्यात आली. मात्र माहिती दिल्यानंतर खात्यातून संपूर्ण पैसे लंपास करण्यात आले.