शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

कोविड टेस्टींगसाठी जादा दर आकाराल तर खबरदार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

आयुवैज्ञानिक संस्था तथा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शन सुचनांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय तथा महानगरपालिका स्तरावर कोविड-१९ आजाराची अ‍ॅन्टीजन टेस्टींगकरिता अ‍ॅन्टीजन टेस्टींग सेंटर व आर.टी.पी.सी.आर. टेस्टींग सेंटर असे एकूण २७ ठिकाणी निशुल्क केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. या केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारण्यात येत नाही.

ठळक मुद्देआता होणार कारवाई : जिल्हा शल्य चिकित्सकांचा गंभीर इशारा

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना तपासणीकरिता जिल्ह्यातील जे खासगी अ‍ॅन्टीजन टेस्टींग सेंटर शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक दर आकारत असल्याचे आढळून आल्यास त्या खासगी अ‍ॅन्टीजन टेस्टींग सेंटरचा परवाना रद्द करून त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, अशा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिला आहे.आयुवैज्ञानिक संस्था तथा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शन सुचनांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय तथा महानगरपालिका स्तरावर कोविड-१९ आजाराची अ‍ॅन्टीजन टेस्टींगकरिता अ‍ॅन्टीजन टेस्टींग सेंटर व आर.टी.पी.सी.आर. टेस्टींग सेंटर असे एकूण २७ ठिकाणी निशुल्क केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. या केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारण्यात येत नाही. तसेच जिल्ह्यात एकूण १७ खासगी अ‍ॅन्टीजन टेस्टींग सेंटर कार्यरत असून त्यांच्याकरिता शासनाने अ‍ॅन्टीजन टेस्टींग शुल्क जास्तीत जास्त ८०० रुपये ठरवून दिलेले आहे. यापेक्षा जास्त शुल्क कोणत्याही खासगी अ‍ॅन्टीजन टेस्टींग सेंटरच्या व्यवसायिकांना आकारता येत नाही. कोणत्याही सेंटर ने ८०० रुपयांपेक्षा जास्त चाचणी शुल्क आकारल्यास याबाबतची माहिती तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालय कोरोना नियंत्रण कक्षाला द्यावी.

आरटीपीआरसाठी दोन खासगी सेंटरसध्या जिल्ह्यात डॉ. अतुल चिद्दरवार पॅथेलॉजी लॅब व डॉ. संगई पॅथेलॉजी लॅब या दोन खासगी संस्थेना आर.टी.पी.सी.आर. स्वॅब कलेक्शन सेंटरसाठी जिल्हा स्तरावरून परवानगी देण्यात आलेली आहे व अशा संस्थेलासुध्दा एक हजार ८०० रुपयांपेक्षा जास्त सेवा शुल्क आकारता येत नसल्याचे डॉ. राठोड यांनी कळविले आहे.

अनेक तक्रारी आल्याखासगी अ‍ॅन्टीजन टेस्टींग सेंटरच्या इन्फ्लुएन्झा (ताप) सदृश्य लक्षणे असल्यास व अ‍ॅन्टीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांचे नमुने हे आर.टी.पी.सी.आर.साठी पाठविणे आनिवार्य असल्यामुळे खासगी अ‍ॅन्टीजन टेस्टींग सेंटर असे नमुने शासकीय व्ही.डी.आर.एल. लॅब, शासकीय वैद्यकीय महाविद्यलाय, चंद्रपूर येथे पाठवितात.  या नमुन्यांकरिता शासनातर्फे कोणत्याही प्रकारचे सेवाशुल्क आकारण्यात येत नाही. तथापि काही खासगी अ‍ॅन्टीजन टेस्टींग सेंटर हे आर.टी.पी.सी.आर. टेस्टसाठीदेखील परस्पर अ‍ॅन्टीजन टेस्टींगचे सेवाशुल्क ८०० रुपये घेतल्यावरसुध्दा अतिरीक्त सेवाशुल्क आकारत आहे. तशा तक्रारी आल्या आहेत. ही बाब अत्यंत खेदाची आहे. अशा प्रकारच्या घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हा सामान्य रूग्णालय कोरोना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या