शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

झरपट नदीपात्राच्या खोलीकरणाला सुरूवात

By admin | Updated: March 21, 2017 00:37 IST

महाकाली यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगर पालिकेकडून यात्रेची जय्यत तयारी चालली असून

यात्रेची जय्यत तयारी : हंसराज अहीर यांच्याकडून कामाची पाहणीचंद्रपूर : महाकाली यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगर पालिकेकडून यात्रेची जय्यत तयारी चालली असून भाविकांना सोईसुविधा पुरविण्यासाठी नियोजन सुरू आहे. भाविकांना पवित्र स्नान करता यावे यासाठी झरपट नदीची स्वच्छता केली जात असून नदी पात्र खोलीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. रविवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या कामाची पाहणी केली. झरपट नदीची होत असलेली दुरवस्था व स्वच्छतेबाबत झालेले दुर्लक्ष व नदीतील दूषित पाणी, नदीपात्रात इकोर्निया वनस्पती वाढत आहे. नदीच्या स्वच्छतेबाबत मागील अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू असून महानगरपालिकेच्या माध्यमातून नदीच्या स्वच्छतेचे कार्य ना. अहीर यांच्या पुढाकारातून सुरू झाले आहे. ना. अहीर यांनी झरपट नदीच्या खोलीकरणाकरिता धारीवाल इंन्फ्रास्ट्रक्चवर प्रा. लि. ताडाळी या कंपनीला सामाजिक दायित्व स्वीकारून झरपट नदीचे खोलीकरण करण्यास योगदान द्यावे, असे निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार धारीवाल इंन्फ्रास्ट्रक्चरने झरपट नदीच्या खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. ना. अहीर यांनी रविवारी प्रत्यक्ष मोक्यावर जावून या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय राऊत, मनपा गटनेते अनिल फुलझेले, जिल्हा महामंत्री राजेश मून, जिल्हा सचिव राहुल सराफ, नगरसेवक धनंजय हुड, माजी नगरसेवक शंकर वाकोडे, धारीवाल इंन्फ्रास्टक्चवर लिमि.चे बसाब घोष, संदीप मुखर्जी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवाने, महानगरपालिकेचे अभियंता अनिल घुमडे, महेश बारई, मोहन चौधरी, राजू घरोटे, तेजा सिंह, श्याम कनकम, अशोक सोनी व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश भेटीदरम्यान ना. अहीर यांनी मनपाचे अधिकारी, पाटबंधारे विभाग, धारीवालचे बसाव घोष यांना कामाबाबत आवश्यक सूचना दिल्या व काम जलदगतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. नदीच्या खोलीकरणानंतर सौंदर्यीकरणासाठी निधीची उपलब्धता करण्याचा प्रयत्न केला जाईल. ऐतिहासिक काळापासून अस्तित्वात असलेल्या या नदीचे सौंदर्य अबाधित राहिले पाहिजे, असेही ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.