शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला सुरुवात

By admin | Updated: October 15, 2014 23:30 IST

येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला आजपासून सुरुवात झाली. मात्र, आज विधानसभा निवडणूकीसाठी मतदान असल्याने दरवर्षीसारखी गर्दी दिसून आली नाही.

चंद्रपूर : येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला आजपासून सुरुवात झाली. मात्र, आज विधानसभा निवडणूकीसाठी मतदान असल्याने दरवर्षीसारखी गर्दी दिसून आली नाही. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहरातून वाहनासह मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत अनुयायींचा मोठ्या संख्येने सहभाग होता.दोन दिवस चालणाऱ्या सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध, आंबेडकरी विचारवंत, विविध समीक्षक, साहित्यिक, देश-विदेशातील अभ्यासक येथे आज दाखल झाले. विचारवंताचे उद्या गुरुवारला प्रबोधन होणार आहे. समारंभस्थळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिचे जतन केलेला अस्थिकलश दर्शनार्थ ठेवण्यात आले आहे. बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्ममय आनंदाची रुजवण, जगविख्यात बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्म श्रवण, धम्मसंबंधित उपयुक्त वस्तुंचे स्टॉल, बोधीवृक्षाचे दर्शन हे या समारंभाचे खास वैशिष्ट आहे. थायलंड येथून दीक्षाभूमीवरील बुद्ध विहारात १६.५ फुट उंच अभय मुद्रेतील बुद्धरुपाचे दर्शन तसेच श्रद्धेय भिक्खू संघाकडून धम्म श्रेवणद्वारा धम्ममय आनंदाची रुजवण करता येणार असून जगविख्यात बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्म श्रवण द्वारा मानसवृद्धी, धम्मसंबंधीत उपयुक्त वस्तुचे स्टॉल, दीक्षाभूमीवरील रोपणातून बहरलेल्या बोधिवृक्षाचे दर्शन बांधवांना घेता येत आहे. संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात रोषणाई करण्यात आली असून दीक्षाभूमीस्थळी तथागत गौतम बुद्ध व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य छायाचित्र उभारण्यात आले आहे. उद्या १६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता अस्थिकलश मिरवणूक निघणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)