"कारण काही नाही, बाबा-आई व भावाकडे लक्ष द्या".. असे लिहून युवतीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 20:48 IST2021-09-01T20:48:33+5:302021-09-01T20:48:59+5:30
Chandrapur News चंद्रपूर शहरातील खांजी परिसरात एका २१ वर्षीय युवतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

"कारण काही नाही, बाबा-आई व भावाकडे लक्ष द्या".. असे लिहून युवतीने घेतला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील खांजी परिसरात एका २१ वर्षीय युवतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. मोना हरिदयाल चव्हाण असे मृत युवतीचे नाव आहे. ("Because there is reason, pay attention to parents and brother" and she hanged)
दुपारी घरी कोणीही नसल्याची संधी साधून घरातील वरच्या खोलीमध्ये मोनाने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील घरी आल्यानंतर दार उघडत नव्हते. दरवाजा तोडून खोलीमध्ये बघितले असता मोनाने गळफास घेऊन तिचा जागीच मृत्यू झाला होता. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्या खोलीमध्ये एक चिठ्ठी आढळून आली. "कारण काही नाही. बाबा आई व भावाकडे लक्ष द्या", असे नमूद करण्यात आले. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.