नकोडात जुन्या वैमनस्यातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST2021-05-18T04:29:29+5:302021-05-18T04:29:29+5:30

घुग्घुस : नकोडा गावात जुन्या वैमनस्यातून दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर यातील एकाला दुसऱ्याने मारहाण केली. घुग्घुस पोलिसांनी तक्रारीवरून दोनजणांविरुध्द ...

Beaten by old enmity in Nakoda | नकोडात जुन्या वैमनस्यातून मारहाण

नकोडात जुन्या वैमनस्यातून मारहाण

घुग्घुस : नकोडा गावात जुन्या वैमनस्यातून दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर यातील एकाला दुसऱ्याने मारहाण केली. घुग्घुस पोलिसांनी तक्रारीवरून दोनजणांविरुध्द गुहा दाखल केला आहे.

सुमेरसिंग संदीप सिंग बैस यांच्याशी अक्षय रत्ने यांचे जुन्या वैमनस्यातून भांडण झाले. याचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यात अक्षय रत्ने हा रक्तबंबाळ झाला. कल्पना मारोती रत्ने हिच्या तक्रारीवरून सुमेरसिंग संदीप सिंग बैस यांच्याविरुध्द भादंवी ३२४ (३४) अन्वये गुन्हा दाखल केला.

या घटनेच्या आधी सुमेरसिंग हा आपल्या घरासमोर उभा असताना सरू ऊर्फ सर्फराज पटेल याने आपल्या साथीदारासह जुन्या वादातून विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी सुमेरसिंग याच्या तक्रारीवरून आरोपी सरू ऊर्फ सर्फराज पटेल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beaten by old enmity in Nakoda