चंद्रपूर जिल्ह्यात मालगाडीच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 10:22 IST2020-08-17T10:21:04+5:302020-08-17T10:22:11+5:30
बल्लारशाहकडून गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडीच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारच्या रात्री नागभीड तालुक्यातील तळोधी - आलेवाही सेक्सन दरम्यान घडली.

चंद्रपूर जिल्ह्यात मालगाडीच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारशाहकडून गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडीच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारच्या रात्री नागभीड तालुक्यातील तळोधी - आलेवाही सेक्सन दरम्यान घडली.
बाळापुर - आलेवाही रेल्वे फाटकाच्या जवळ किलो मिटर क्र. ११४९/१६ दरम्यान हे अस्वल रस्ता पार करीत असावे.यादरम्यान ही रेल्वे मालगाडी आली. आणि या मालगाडीच्या धडकेत या अस्वलाचा मृत्यू झाला. दरम्यान अस्वलाला दिलेल्या धडकेनंतर ही मालगाडी १ किमी असलेल्या बाळापूर स्टेशनवर येऊन थांबली. यावेळी मालगाडीचे एअर ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आहे. त्यामुळे तब्बल दोन तास या मालगाडीला बाळापूर स्टेशनवर मुक्काम करावा लागला. ब्रेक दुरूस्त झाल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास ही गाडी गोंदियाकडे रवाना झाली. दरम्यान रेल्वे विभागाकडून तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयास या अपघाताबद्दल माहिती देण्यात आली.