बल्लारपूर प्रीमियर लीग स्पर्धेचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:24 IST2021-01-14T04:24:06+5:302021-01-14T04:24:06+5:30

बल्लारपूर : बल्लारपूर प्रीमियर लीगतर्फे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. बल्लारपूर येथील ...

Ballarpur Premier League Prize Distribution | बल्लारपूर प्रीमियर लीग स्पर्धेचे बक्षीस वितरण

बल्लारपूर प्रीमियर लीग स्पर्धेचे बक्षीस वितरण

बल्लारपूर : बल्लारपूर प्रीमियर लीगतर्फे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे बल्लारपूर प्रीमियर लीग (बीपीएल सीझन ४)तर्फे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेत आठ टीमचा सहभाग होता. २५ डिसेंबरपासून सुरू झालेली ही स्पर्धा आयपीएल पद्धतीनुसार खेळविण्यात आली. १० जानेवारी रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना एमएच ३४ सीसी विरुद्ध गेम सिंगर या टीममध्ये झाला. त्यात गेम सिंगर टीमने विजय मिळविला.

स्पर्धेचे बक्षीस वितरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे नियोजन सभापती अरुण वाघमारे, इस्माईल ढाकवाला, ॲड. राजेश सिंग, तेजिंदरसिंग दारी, ॲड. मेघा भाले आदी उपस्थित होते. या स्पर्धेत उत्कृष्ट खेडाळू म्हणून अमर नगराळे यांची निवड करण्यात आली. स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी बल्लारपूर प्रीमियर लीगचे अध्यक्ष दीपक सौदागर, उपाध्यक्ष परवेज शेख, सचिव रिझवान ढाकवाला, संयोजक अजय रासेकर, सचिन धामणकर, गोपी ठाकूर, शुभम सौदागर, विनोद गिडवानी, अनिल मारशेट्टीवर, मेजर अजित सिंग बालू कोंडूकवर, अमर नगराळे, नीलेश माहुरे, बबलू धुर्वे, इस्माईल शेख, अमरजित निषाद यांनी सहकार्य केले.

Web Title: Ballarpur Premier League Prize Distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.