शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे विचार माणुसकीला श्रेष्ठ बनविणारे

By admin | Updated: April 15, 2016 01:19 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती विरहित समाज व्यवस्था, सामाजिक न्याय व समता प्रथापित करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले.

सुधीर मुनगंटीवार : जयंतीनिमित्त क्रांतीसूर्याला अभिवादनचंद्रपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती विरहित समाज व्यवस्था, सामाजिक न्याय व समता प्रथापित करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून माणुसकीला श्रेष्ठ बनविण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करू या, असे आवाहन वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर राखी कंचलार्वार, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व मनपा आयुक्त सुधीर शंभरकर हे यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहचावे, यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात १७० कोटींची तरतूद केली असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जपानमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. बाबासाहेबांनी लंडन येथे वास्तव्य केलेले घर महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतले आहे. इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बाबासाहेबांचा आई-वडिलांचे वास्तव्य असलेल्या गावाचा तसेच माई रमाबार्इंच्या गावाचासुध्दा विकास करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असल्याचे ना. हंसराज अहीर यांनी सांगितले. केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जयंती समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या वर्षात करण्यात येणार आहे. आपणही त्यांचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प करू या, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला असंख्य नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)