शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

रुग्णालयातील आयुष विभाग पोरका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:26 AM

उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे आयुष कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाह्यरुग्ण व आंतर रुग्णांनाही सेवा देण्यास बाध्य केले जात असल्याने या कक्षात उपलब्ध साहित्याचा वापरच होताना दिसत नाही.

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज : रुग्णांवर उपचार करताना अडचणींचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कमूल: उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे आयुष कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाह्यरुग्ण व आंतर रुग्णांनाही सेवा देण्यास बाध्य केले जात असल्याने या कक्षात उपलब्ध साहित्याचा वापरच होताना दिसत नाही. आयुर्वेदाला अ‍ॅलोपॅथिकप्रमाणे साईड इफेक्ट नसल्याने आजही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे रुग्णालयात आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, मसाज, योग व प्राणायम आदी सेवा उपलब्ध होत आहेत. साहित्य व औषधांच्या साठ्यासह उपलब्ध आहेत. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कमतरता असल्याने अ‍ॅलोपॅथिक रुग्णांच्या सेवेत लावले जाते. परिणामी आरोग्य अधिकाऱ्यांअभावी आयुष कक्ष पोरका झाला आहे.भारतात ऋषीमुनींच्या काळापासून आयुर्वेदाला विशेष महत्त्व दिले जात आहे. आजारावर चांगला परिणाम उशिरा होतो. आजही आयुर्वेद उपचार करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. याच उद्देशाने शासनाने उपजिल्हा रूग्णालयात आयुष कक्षाची निर्मिती केली. रुग्णालया दरदिवशी शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र त्याचा प्रचार पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. तसेच आयुष कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा उपजिल्हा रुग्णालयात आंतर रुग्ण व बाह्यरुग्ण तपासणीसाठी लावले जात असल्याने लाखो रुपयाची साहित्य व औषधी धुळखात पडले आहे.उपजिल्हा रुग्णालयात आयुष कक्षात आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथिक, मसाज, योगा व प्राणायम आदी सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. जनतेचे आयुष्यमान वाढावे व आयुर्वेदाचा वापर करता यावा, यासाठी आयुष कक्षाची उभारणी करण्यात आली. मात्र झटपट आजार बरा व्हावा, ही मानसिकता कायम असल्याने आयुर्वेदाकडे वळायला बरेच रूग्ण तयार होत नसल्याचे तालुक्यात दिसून येते. येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकासह ९ पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून आयुष विभागातही सेवा देतात. सहा वैद्यकीय अधिकाºयांच्या भरोशावर उपजिल्हा रुग्णालय सुरु आहे. मात्र ही संख्या पुरेशी नाही. वैद्यकीय अधिकाºयांच्या कमतरतेमुळे आयुष कक्षातील वैद्यकीय अधिकारी बाह्य रुग्णांवर अ‍ॅलोपॅथिकचा उपचार केला जात आहे. वेळोवेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी केली जात आहे. मात्र वैद्यकीय ही पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे वैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याची चिन्हे दिसत आहे.प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गेडाम यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर वैद्यकीय डॉ. बाबर यांची नियुक्ती झाली. पण, ते रुजू न झाल्याने सध्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा प्रभार डॉ. उज्वल इंदूरकर यांच्याकडे आहे. अवघ्या आठ दिवसांत रुग्णालयात त्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. सकाळी १० वाजता येणारे कर्मचारी आता ९ वाजता यायला लागले आहे. कर्तव्यात तत्पर असलेले अधिकारी असल्यास रुग्णालयातील सेवा लोकाभिमुख होवू शकते. त्यामुळे रिक्त पदांची भरती करून आयुष विभागातील रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा देण्याची मागणी होत आहे.उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांची गर्दी वाढलीयेथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार करणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. काही डॉक्टर उत्तम उपचार करतात. प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांची मूल तालुक्यात सर्वाधिक संख्या आहे. खासगी डॉक्टरांकडे उपचार करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. शिवाय, बहुतांश डॉक्टर मनमानी शुल्क घेतात. सरकारने अशा डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे, अशी मागणी आहे.

टॅग्स :Healthआरोग्य