शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांची पिकांसाठी जागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

दिवसागणिक वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल मूर्ती येथील शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. परंतु वनविभागाचे कर्मचारी केवळ पंचनामा करून मोकळे होतात. वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात अजूनही वनविभागाला यश आले नाही, ही शोकांतिका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वत:च्या जिवाची कोणतीही पर्वा न करता वन्यप्राण्यांचा धोका पत्करून शेती जगली पाहिजे, या उद्दात हेतूने शेतकरी रात्री पिकांची राखण करीत रात्रभर शेतात थांबून जागल करीत आहे. वन्यप्राण्यांमुळे त्यांच्या जिविताला धोका निर्माण होत आहे.निसर्गाची अवकृपा आणि सरकारचा नाकर्तेपणा यामुळे शेतकरी दिवसेंदिवस हतबल होत चालला आहे. कोरडवाहू शेतीचे दिवस संपले आहे. शेती पिकेल तर देश टिकेल हे ब्रीदवाक्य केवळ नावापुरतेच उरले आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. राजुरा तालुक्यातील बहुतांश भाग जंगलांनी व्यापला आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी मोठया प्रमाणात शेतात येतात. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, वरोडा, मानोली, बाबापुर, कढोली, अंतरगाव, गोयेगाव, चूनाळा, पंचाळा, सातरी, चनाखा परिसरात वन्यप्राण्यांनी शेतात मोठया प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्ताची जबाबदारी वनविभागाची असताना अजूनही शासनाकडून कोणतीही उपाययोजना केली नाही.दिवसागणिक वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल मूर्ती येथील शेतकºयांवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. परंतु वनविभागाचे कर्मचारी केवळ पंचनामा करून मोकळे होतात. वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात अजूनही वनविभागाला यश आले नाही, ही शोकांतिका आहे. वन्यप्राण्यांकडून होणाºया नुकसानीचा आकडा खूप मोठा आहे. परंतु वनविभाग केवळ तोकडी नुकसान भरपाई देऊन शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसत आहे. सध्या शेतात कापूस, तूर, ज्वारी, चना पिके डौलाने उभी आहेत. परंतु वन्यप्राणी पिकांची दिवसा डोळ्यादेखत नासधूस करीत आहे. काबाडकष्ट करून जिवापाड जपलेल्या पिकांची एका रात्रीतून वाट लावली जात आहे. हाती येणारे पीक वन्यप्राणी उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. कपाशीला बोंडे लागली असून कापूस निघायला सुरुवात झाली आहे.तूर पीक फुलोºयावर आले आहे. कपाशीवर केला जाणारा खर्च मोठा आहे. पिकांवर केलेला खर्च भरून निघेल की नाही, याची चिंता शेतकºयांना चांगलीच सतावत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकरी हतबल झाला असताना वन्यप्राणी पिकांचे मोठे नुकसान करीत आहे. त्यामुळे शेतकºयांना पीक वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून ‘जागल’ करावी लागत आहे. परंतु अजूनही वनविभागाने वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला नाही.कायमस्वरुपी बंदोबस्त व्हावावन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी जागल करतात. परंतु जंगली प्राणी शेतकºयांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करीत आहे. यावर वनविभागाने कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.वन्यप्राणी भरदिवसा शेतात येऊन पिकांची मोठया प्रमाणात नुकसान करीत आहे. उसनवारी व कर्ज काढून शेतकºयांनी मोठया कष्टाने पीक फुलविले आहे. परंतु हाती येणारे पीक वन्यप्राणी उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकºयांना स्वत:चा जीव धोक्यात घालून पिकांच्या रक्षणासाठी जागल करावी लागत आहे.-गुलाबराव चौथले, शेतकरी, पंचाळा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती