शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

राज्यात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:00 PM

राज्यातील नागरी क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देमंत्रीमंडळाचा निर्णय अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील नागरी क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०१९-२० चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना याबाबत केलेल्या घोषणेची पूर्तता झाली आहे.जगात सर्वच क्षेत्रामध्ये प्रयोगशीलतेतून नवनवीन तंत्राचा विकास होत आहे. उपलब्ध कमी क्षेत्रामध्ये जास्त वृक्षांचे आवरण आणि घन वन अर्थात डेन्स फॉरेस्ट निर्माण करण्याचा प्रयोग जपानमध्ये मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केला. भारतामध्ये बंगलोर, हैद्राबाद इत्यादी ठिकाणी हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हयातील आनंदवन येथे महारोगी सेवा समितीच्या जमिनीवर हा प्रकल्प उत्तमरित्या विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे यश लक्षात घेवून राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका व शहर विकास प्राधिकरणे यांच्या क्षेत्रात आणि ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे.राज्यातील वनक्षेत्र व वनेतर क्षेत्रावरील वृक्षाच्छादन २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी हरित महाराष्ट्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यात तीन वर्षात ५० कोटी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १ जुलै २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या तीन महिन्यांच्या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ही वृक्ष लागवड मोहिम व संगोपन कार्यक्रम निरंतरपणे पुढे सुरू राहण्यासाठी शहरी आणि काही ठिकाणी ग्रामीण भागात असलेली मोकळया जागांची कमतरता लक्षात घेता अन्य पर्याय वापरून वृक्षाच्छादन वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील शहरी व ग्रामीण भागात अटल आनंदवन घन वन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा घेतलेला निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.योजनेचा उद्देशशहरी भागातील जागेची कमतरता विचारात घेवून छोटया छोटया क्षेत्रात मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करणे, रोपवनास जैविक पदार्थ, सेंद्रीय खते, पाणी अशा पूरक संसाधनाची जोड देवून कमी कालावधीत रोपांची चांगली व जलद वाढ साधणे, जिवंत रोपांची टक्केवारी जास्तीत जास्त राखणे, शहरी भागात वृक्षराजी वाढवून प्रदूषणावर नियंत्रण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार