पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:19 IST2019-08-29T00:18:33+5:302019-08-29T00:19:07+5:30
पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे ‘एक कुटुंब- एक किट’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एका किटमध्ये तांदूळ, तुरडाळ, गव्हाचे पीठ, आदी जिवनावश्यक वस्तू अशा एक लाख ८० हजार रुपयांचे साहित्य पाठविण्यात आले. सदर साहित्य कोल्हापुरातील शिक्षक संघटनेच्या माध्यमातून वितरीत करण्यात येणार आहे.

पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे पूरग्रस्तांना मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोल्हापूर परिसरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूर आला. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे अनेक सामाजिक संघटनेतर्फे मदत करण्यात येत आहे. त्याना हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने एक लाख ८० हजार रुपयांची मदत पाठवली.
पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे ‘एक कुटुंब- एक किट’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एका किटमध्ये तांदूळ, तुरडाळ, गव्हाचे पीठ, आदी जिवनावश्यक वस्तू अशा एक लाख ८० हजार रुपयांचे साहित्य पाठविण्यात आले. सदर साहित्य कोल्हापुरातील शिक्षक संघटनेच्या माध्यमातून वितरीत करण्यात येणार आहे. मदत संकलनासाठी राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, विजय भोगेकर, अल्का ठाकरे, दीपक वरहेकर, रवी सोयाम, निखिल तांबोळी, सुनीता इटनकर, शालिनी देशपांडे माधुरी निंबाळकर, गजानन चिंचोळकर, संजय चिडे, सुनील जाधव, राजू घोरुडे, विनोबा आत्राम, अतुल तिवाडे, नरेंद्र डेंगे, निरंजन गजबे आदींनी प्रयत्न केले.