राजुरा नगरपालिकेच्या ९० हजारांच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी
By Admin | Updated: February 27, 2016 01:23 IST2016-02-27T01:23:29+5:302016-02-27T01:23:29+5:30
राजुरा नगरपालिकेचे ९० हजार रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक गुरुवारी झालेल्या नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले.

राजुरा नगरपालिकेच्या ९० हजारांच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी
राजुरा : राजुरा नगरपालिकेचे ९० हजार रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक गुरुवारी झालेल्या नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले.
नगराध्यक्षा मंगला आत्राम यांनी ९० हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. सदर अंदाजपत्रकात २०१६-१७ वर्षात महसूल व भांडवली उत्पन्न ३६ कोटी ३६ लाख ७२ हजार अपेक्षित असून खर्च ३६ कोटी ३६ लाख ३२ हजार अपेक्षित आहे.
मागील शिलकीसह अंदाजपत्रक शिल्लक ९० हजार आहे. आजच्या बजेटचे वैशिष्ट्य असे की, स्पर्धा परीक्षाकरिता अभ्यासिका तयार करणे, वाचनालय सुसज्ज करणे. शहर स्वच्छ व सुंदर आणि १०० टक्के हागणदारीमुक्त करणे, युवकाकरिता चार व्यायामशाळा बांधकाम करणे, चार प्रभागात बगिचे तयार करणे, तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम पूर्णत्वास नेणे, या व्यतिरिक्त रस्ते, नाल्या व इतर आवश्यक कामाचा समावेश करण्यात आलेला आहे.
सभेला उपनगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी सुनील बल्लाळ उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)