शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

जनावरांची तस्करी; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2021 5:00 AM

चंद्रपूर जिल्ह्यालगतच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांत कतलीसाठी तीन कंटेनरमध्ये कोंबून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात लोहारा गावाजवळ सापळा रचला. वाहनांची पायलेटिंग करणारा मुख्य म्होरक्या इमरान गोसीर खान (वय ३५, रा. गडचिरोली) याला ताब्यात घेतले. त्यानंतर दोन-दोन किलोमीटरच्या अंतरावर तिन्ही कंटेनर ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात कतलीसाठी कंटेनरमध्ये जनावरे कोंबून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. गडचिरोली जिल्ह्यातून येणारी तिन्ही वाहने लोहारा गावाजवळ ताब्यात घेण्यात आली. यावेळी चार तस्करांना ताब्यात घेण्यात आले असून, ९८ जनावरांची सुटका करण्यात आली. सर्व जनावरे गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यालगतच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांत कतलीसाठी तीन कंटेनरमध्ये कोंबून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात लोहारा गावाजवळ सापळा रचला. वाहनांची पायलेटिंग करणारा मुख्य म्होरक्या इमरान गोसीर खान (वय ३५, रा. गडचिरोली) याला ताब्यात घेतले. त्यानंतर दोन-दोन किलोमीटरच्या अंतरावर तिन्ही कंटेनर ताब्यात घेतले. यावेळी वाहनांची तपासणी केली असता, चार ते पाच जनावरांचा मृत्यू झाला होता. यावेळी शेख अकबर शेख चांद शेख मेहबूब शेख  इमरान गोसीर खान शेख मेहबूब शेख अलताफ, मुक्तार मुबारक (२७, रा. वाकडी, तेलंगणा) यांच्याविरुद्ध रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात संजय आतकुलवार, प्रांजल झिलपे, रवींद्र पंधरे, नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष गौरकार, सतीश बगमारे, दिनेश हरडे यांच्या पथकाने केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करी