शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरू झाली पशुगणना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:16 IST

मोबाइल अॅपचा वापर : प्रगणक घेताहेत पणूंची जाती व लिंगनिहाय नोंदी

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : २१व्या पंचवार्षिक पशुगणनेला जिल्ह्यात सोमवारपासून (दि. २५) सुरुवात करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही पशुगणना केली जात आहे. पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशुंची अचूक व योग्य माहिती देण्यात यावी, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.

पशुगणनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रनिहाय कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या १६ पशुधन प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. ही पशुगणना नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घेण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या. पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून अर्थव्यवस्थेत याचे लक्षणीय योगदान आहे. 

शासनाला नियोजनासाठी पायाभूत सांख्यिकीची आवश्यकता असते. ही माहिती गणनेच्या स्वरूपात गोळा केली जाते. पशुधनाच्या निरंतर विकासासाठी योजना आखण्यासाठी पशुगणना महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. पशुपालन पूरक उत्पन्न निर्मिती बरोबरच दूध, अंडी व मांस ही पशुधन उत्पादने पोषक आहाराचा महत्त्वाचा स्रोत आहे. या पार्श्वभूमी ही पशुगणना लोकोपयोगी ठरणारी आहे. १९१९ पासून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. २०१९ मध्ये २०व्या पशुगणनेमध्ये प्रथमच प्रजाती ग्रामीण व नागरी क्षेत्रनिहाय पशुधनाची आकडेवारी गोळा करण्यात आली.

"अचूक पशुगणना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामीण, शहरी भागासाठी प्रगणक व पर्यवेक्षक नेमण्यात आले. प्रगणकांद्वारे गोळा केलेली माहिती शासकीय योजनांसाठी खूपच उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्याकडील माहिती प्रगणकांना द्यावी." - मंगेश काळे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन, चंद्रपूर

"जिल्ह्यात पशुगणना सुरु करण्यात आली. मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या पशुगणनेतून जिल्ह्यातील किती पशुधन आहे, हे कळणार आहे. पाळीव पशूची गणना कशी करायची, पशू गणनेचा उद्देश आदी घटकांचे प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले. पशुपालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे." - डॉ. उमेश हिरुळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. चंद्रपूर

१६ प्रकारच्या प्राण्यांची जागेवर मोजणी कुटुंब घरगुती उद्योग व इतर संस्थांकडून पाळलेल्या गायवर्ग, म्हॅसवर्ग, मिथुन, याक, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती आणि कुक्कुट पक्षी जसे की कोंबडे- कोंबड्या, बदक, टर्की, इमू, क्चेल, गिनी, शहामृग तसेच इतर कुक्कुट पक्षी, अशा १६ प्रकारच्या प्राण्यांची जागेवर मोजणी करण्यात येणार आहे. तसेच भटकी कुत्री, गटक्या गाई व प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कम्युनिटी) यांचीदेखील माहिती गोळा करण्यात येणार आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर