आनंदवन स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:30 IST2019-02-26T23:27:08+5:302019-02-26T23:30:06+5:30

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने आयोजित आदर्श ग्राम पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा ग्रामसेवक व सरपंच यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडला. यावेळी अनेक ग्रामपंचायतनींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Anandvan Smart Village Award | आनंदवन स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित

आनंदवन स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित

ठळक मुद्देआदर्श ग्राम पुरस्कार वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने आयोजित आदर्श ग्राम पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा ग्रामसेवक व सरपंच यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडला. यावेळी अनेक ग्रामपंचायतनींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आनंदवनला स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आनंदवन हे गाव सर्व निकषांच्याही पुढे आहे. स्वच्छता, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, जलसुविधा, आरोग्य, याबाबत गावात विशेष उपक्रम राबविले जात आहेत. पाळणाघर ते पदवीधरपर्यंतचे शिक्षण व्यावसायिक शिक्षणही येथे आहे. यासोबतच अपंगाचे प्रशिक्षण केंद्र, अंध विद्यालय, मुकबधीर विद्यालय, कृषी तंत्र निकेतन व कृषी महाविद्यालय, बँकींग सेवा आदींचे प्रशिक्षणही दिले जाते. गावात शौचालयाच्या वापर शंभर टक्के केला जातो. आनंदवन ही पेपरलेस ग्रामपंचायत असून आंतरजातीय व आंतर विकलांग विवाह सोहळे दरवर्षी आयोजित केले जातात. एकूणच सर्व सुविधांनी समृध्द असलेले आनंदवन हे स्मार्ट ग्राम ठरले आहे.
आनंदवन ग्रामपंचायतीला वरोरा पंचायत विभागातून सर्वात जास्त गुण मिळाविल्यामुळे स्मार्ट ग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सरपंच सुधारकर कडू व ग्रामसेविका विद्या गिलबिले यांनी हा सन्मान स्वीकारला.
सर्व आनंदवनवासीयांनी तसेच आमटे परिवारांनी या पुरस्काराबाबत आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हसंराज अहीर, वित्त नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बाळू धानोरकर, आमदार नाना शामकुळे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, कृषी पशुसंवर्धन सभापती अर्चना जीवतोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सभापती महिला व बालकल्याण गोदावरी केंद्रे, समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, प्रबोधनकार उद्धव गाडेकर महाराज आदी उपस्थित होते.

Web Title: Anandvan Smart Village Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.