व्याजाच्या रकमेसाठी सावकाराने मायलेकावर पेट्रोल टाकून लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 16:02 IST2019-05-07T16:02:03+5:302019-05-07T16:02:46+5:30

एका सावकाराने व्याजाने दिलेल्या रकमेसाठी महिलेसह तिच्या मुलावर पेट्रोल टाकून आग लावली.

For the amount of interest, the lender was forced to burnt of ladies and boy | व्याजाच्या रकमेसाठी सावकाराने मायलेकावर पेट्रोल टाकून लावली आग

व्याजाच्या रकमेसाठी सावकाराने मायलेकावर पेट्रोल टाकून लावली आग

चंद्रपूर : एका सावकाराने व्याजाने दिलेल्या रकमेसाठी महिलेसह तिच्या मुलावर पेट्रोल टाकून आग लावली. यामध्ये दोघेही भाजले असून त्यांना कोलसिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

सदर घटना सरकारनगर येथील असून आज दुपारी 1:00 च्या सुमारास घडली. सरकारनगर येथील रघुनाथ हरणखेडे यांच्यावर असलेल्या कर्जाची रक्कम मागण्यासाठी सावकार आला होता. दरम्यान, हरणखेडे यांनी आज सकाळी पैसे देण्याचे कबूल केले. यानुसार आज दुपारी तो सावकार पैसे मागण्याकरिता आला,  परंतु हरणखेडे घरी नसतानाही त्याने हरणखेडे यांच्या पत्नीशी भांडण सुरु झाले. 

यावेळी सावकार 'तू माझे पैसे दे, नाहीतर मी तूला जाळून टाकणार', अशी धमकी देऊ लागला आणि त्याने लगेच पेट्रोल आणून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हरणखेडे यांची पत्नी व मुलगा भाजला आहे. घरातील साहित्यही पेट्रोल टाकून जाळले. घराशेजारील लोकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच, मायलेकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याशिवाय, अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, यासंबंधी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: For the amount of interest, the lender was forced to burnt of ladies and boy