शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

सहाही विधानसभा संघाच्या अंतिम मतदार याद्या जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:00 IST

निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि मतदारांच्या निवडणुकी संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने १९५० हेल्पलाईन निर्माण केली आहे. त्यामुळे मतदारांना कधीही माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या हेल्पलाईन अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र तसेच जिल्हा संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे. १

ठळक मुद्देमतदारांनो नावे तपासा : स्थानिक स्वराज संस्थेतही राहणार याद्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात २१ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार असून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या सुधारित अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा या सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या याद्या जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, चंद्रपूर शहर महानगरपालिका, नगरपरिषद नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या कार्यालयात तसेच संबंधित मतदान केंद्रावर नागरिकांना पाहण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. नागरिकांनी मतदार याद्यांमध्ये स्वत:चे नाव आहे काय, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.प्रशासनाच्या हेल्पलाईनवर आतापर्यंत १४५ तक्रारीनिवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि मतदारांच्या निवडणुकी संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने १९५० हेल्पलाईन निर्माण केली आहे. त्यामुळे मतदारांना कधीही माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या हेल्पलाईन अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र तसेच जिल्हा संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे. १९ सप्टेंबरपासून आतापर्यंत या हेल्पलाईनवर १४५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. चंद्रपूरमध्ये १९५० हेल्पलाईन व मदत केंद्राचे स्वतंत्र कक्ष जिल्हा नियोजन भवन येथे स्थापन केलेले आहे. या टोल फ्री हेल्पलाईनवर मदतीच्या सेवेचा २४ तास लाभ देत आहे. या हेल्पलाइन व मदत सेवेमध्ये नागरिकांना निवडणूक आणि मतदानासंबंधीची माहिती मिळवता येते. मतदारांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात येते. मतदान यादीत नाव नोंदवायचे असल्यास काय करावे, याबाबतीत मार्गदर्शन, मतदान ओळखपत्र, मतदान अर्ज निगडीत सर्व माहिती, मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपले मतदान कक्ष कुठे याची खात्री करण्यासाठी या हेल्पलाईनचा उपयोग होतो. मतदानाच्या दिवशी गोंधळ उडू नये, यासाठी या हेल्पलाईनचा वापर करावा, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. या हेल्पलाईनच्या सहाय्याने मतदार नोंदणीसाठी संबंधितांना अधिकृत माहिती मिळविणे सोपे झाले आहे. मतदान यादीतील त्यांच्या वैयक्तिक माहितीचा तपशील, मतदान केंद्र, बूथ लेव्हल अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक याविषयी मतदार हेल्पलाईन, मोबाइल अ‍ॅप किंवा १९५० हेल्पलाइनवर फोन करून मिळविता येते.प्रशासनाच्या निवडणुकीसंदर्भातील हेल्पलाईनवरून मतदारांना सर्व माहिती पुरविली जाते. जिल्ह्यातील नागरिकांनी या हेल्पलाईनचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा.- डॉ. कुणाल खेमनार,जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019