शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मिळून साऱ्या जणींनी घेतला प्रगतीचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:38 IST

बांबूपासून केवळ सुप, टोपल्या आणि दिवाणखाण्यात सजविणाºया वस्तुचींच निर्मिती करता येऊ शकते, या पारंपरिक विचारांना छेद देणाऱ्या बांबू मूल्यवर्धित (रुपांतरीत) व्यावसायिक प्रकल्पांमुळे रोजगाराची अनेक दालने उपलब्ध होत आहेत.

ठळक मुद्देबांबू धोरणाचे फ लितमूल्यवर्धित जीवनोपयोगी वस्तुंमुळे विस्तारला स्वयंरोजगारशाश्वत विकासाची संधी

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बांबूपासून केवळ सुप, टोपल्या आणि दिवाणखाण्यात सजविणाºया वस्तुचींच निर्मिती करता येऊ शकते, या पारंपरिक विचारांना छेद देणाऱ्या बांबू मूल्यवर्धित (रुपांतरीत) व्यावसायिक प्रकल्पांमुळे रोजगाराची अनेक दालने उपलब्ध होत आहेत. बांबूची शास्त्रोक्त लागवड, संशोधन, प्रशिक्षण, औद्योगिक वापर आणि बाजारातील टोकाच्या स्पर्धेतही मागील तीन वर्षांपासून स्वयंरोजगार व ग्राहकाभिमुख धोरण नेटाने राबविणे सुरू असल्याने जिल्ह्यातील सुमारे ६०० महिलांना स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या काष्ठ इतिहासात प्रथमच ‘बांबू बांधकाम’ ही अत्याधुनिक संकल्पना कार्यानुभवातून आत्मसात करून चिचपल्ली येथून १४ बांबूदूत (विद्यार्थी) स्वयंरोजगार उभारण्यासाठी सज्ज होत आहेत. जाचक अटीतून बांबू मूक्त झाल्यानंतरची ही मोठी संधीच म्हणावी लागेल.जिल्ह्यात एकूण क्षेत्रफळापैकी ४१.९८ टक्के क्षेत्र हे वनाच्छादीत आहे. विपुल वनसंपदा व पशु पक्ष्यांनी समृद्ध, सागवन व बांबूची मुबलक उपलब्धता ही जिल्ह्याच्या विकासाला दीर्घकालीन चालना देणारी सामर्थ्यस्थळे आहेत. यापूर्वी वृक्षारोपण, संवर्धन व संरक्षण या चौकटीतच अडकलेल्या वनविभागाला बाहेर पडता येत नव्हते. जनताभिमुख वनधोरणाच्या अंमलबजावणीत काही त्रुटी असल्या तरी राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाची प्रतिमा बदलविण्यासाठी धाडसी पाऊल टाकले. त्याचेच फ लित म्हणून बांबूवर आधारीत जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या स्वयंरोजगारातील नवनव्या संधीकडे पाहता येईल. ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पामुळे संरक्षित वनक्षेत्राच्या भोवती बफ र क्षेत्राचे कवच निर्माण झाल्याने वनांवर अवलंबून असणाºया नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली. शिवाय, मानव व वन्यजीव या दोन घटकांच्या संघर्षामुळे समस्यांची तीव्रता वाढू लागली. वनांवरील उपजिविका, अवलंबित्व व संघर्ष कमी करण्यासाठी बांबूवर आधारित स्वयंरोजगाराचे महत्त्व प्रथमच जोरकसपणे पटवून दिले जात आहे. परिणामी, ६५० महिलांनी सुप अथवा टोपल्या विणण्याचा पारंपरिक परिघ ओलांडून शेकडो जीवनोपयोगी वस्तु तयार करण्यासाठी गुंतल्या आहेत. त्यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील ४५०, पोंभुर्णा व मूल तालुक्यातील प्रत्येकी १०० महिलांचा समावेश आहे. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून (बीआरटीसी) बांबू कलेचे धडे घेणाºया या महिलांना आगरतळा येथेही प्रशिक्षित केल्याने हस्तशिल्प व कौशल्य विकासात त्या आता तरबेज झाल्या आहेत. ‘बांबूपासून टोपल्याच बनतात’ असे कुणी विचारले की ‘ते अडाणपणाचे दिवस होते’ या रोखठोक शब्दात युक्तिवाद करून १००-१५० वस्तुंची तोंडपाठ यादीच नागरिकांसमोर ठेवतात.-तर अगरबत्ती पुन्हा दरवळणारआगरझरी, देवाडा, अडेगाव व पळसगाव येथे बांबूपासून सुगंधी अगरबत्ती तयार करण्याचा प्रकल्प सुरू आहे. अत्यल्प भांडवलामध्ये गावातच स्वयंरोजगार मिळाल्याने १०० पेक्षा अधिक महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ४६ अगरबत्ती प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली. तेथील महिलांना ‘सायकल’ बँ्रडसोबत करार केल्याने या व्यवसायाची व्याप्ती वाढली. ‘कॅग’ने त्या स्वयंरोजगाराची दखल घेतली. चंद्रपुरची अगरबत्ती ‘ताडोबा’ या नावाने प्रसिद्ध असली तरी व्यवसायवृद्धीला जिल्ह्यात अजुन मोठा वाव आहे.कारागीरांची बदलली दृष्टीबुरड समूदाय बांबूवर आधारित परंपरागत वस्तु बनविण्याचे काम करीत आहे. तट्टे, डाले, सुप तसेच इतर वस्तु बनविण्यासाठी बांबूचा वापर करतो. वन परिसरातील नागरिक झोपडी, घर, गुरांचा गोठा व संरक्षण कुंपणासाठी बांबूवरच अवलंबून राहतात. मात्र, महिलांना वैज्ञानिक पद्धतीने प्रशिक्षण दिल्याने विविधता वाढली. कारागीरांची दृष्टी बदलली. मूल्यवर्धीत वस्तु निर्माण करण्यासाठी पारंपरिक कलेलाही प्राधान्य दिल्याने बांबूकडे ‘हिरवे सोने’ म्हणून पाहिले जात आहे. कायद्याच्या कचाट्यातून बांबू मुक्त केल्याने खासगी जमिनीवरही बांबूची लागवड करता येऊ शकते.मुनगंटीवारांनी बदलविली वनविभागाची प्रतिमाउद्योगांमुळेच रोजगार निर्मिती होत नाही. तर रोजगाराचे अनेक दालन उघडता येते. हे बांबू प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवून दिले. बांबूच्या माध्यमातून असंख्य महिलांना रोजगार प्राप्त झाला. यामुळे वनविभागाची प्रतिमाही झळाळली.बांबू हे गवत जिल्ह्यात विपुलतेने आढळते. हजारो कारागीरांची उपजिविका बांबूवरच चालते. त्यांच्या पारंपरिक कला-कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षणाची जोड देऊन परंपरागत बांबू उद्योगाला चालना देणारे अनेक अभ्यासक्रम बीआरटीसीद्वारे सुरू आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगाराचे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी व शास्त्रीय पद्धतीने लागवड करून औद्योगिक क्षेत्रातही वापर वाढविण्याचे कार्य जिल्ह्यात सुरू आहे.- राहुल पाटील, संचालकबांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली