जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी शहरात निघाली सर्वपक्षीय रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:53 PM2019-01-25T23:53:33+5:302019-01-25T23:53:50+5:30

वरोरा जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी रॅली काढण्यात आली. यामध्ये अनेक प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होऊन जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

All-party rally in the city to demand the creation of the district | जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी शहरात निघाली सर्वपक्षीय रॅली

जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी शहरात निघाली सर्वपक्षीय रॅली

Next
ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : रॅलीत हजारो नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : वरोरा जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी रॅली काढण्यात आली. यामध्ये अनेक प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होऊन जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
वरोरा नगर परिषदेची निर्मिती सुमारे दीडशे वर्षांपूर्वी झाली. भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना वरोरा शहराचे भौगोलिक महत्त्व समजून त्यांनी व्यापार व उद्योगाच्या विस्तारीकरणाचे शहर म्हणून वरोºयाची निवड केली होती. अशा महत्त्वाच्या शहरालगत असणारे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे जगप्रसिद्ध आनंदवन, नागपूर-चंद्रपूर, यवतमाळ-कान्पा या दोन राष्ट्रीय महामार्गावरील केंद्रभागी असलेले प्रमुख ठिकाण व शैक्षणिक संस्थांचे जाळे, शासकीय कार्यालये, काही अंतरावरील ताडोबा व्याघ्र प्रकल्प, उत्तर-दक्षिण, मध्य-पश्चिम रेल्वेमार्ग, अतिरिक्त जिल्हसत्र न्यायालय, १५० बेडचे उपजिल्हा रुग्णालय, वर्धा नदी, अशा अनेक पूरक बाबींमुळे जिल्हा निर्मितीसाठी वरोरा सोयीस्कर ठिकाण आहे. त्यामुळे नवीन जिल्हा निर्मितीमध्ये वरोºयाला स्थान द्यावे, अशी मागणी मागील काही वर्षांपासून संघर्ष समितीकडून केली जात आहे. यासाठी निवेदन, साखळी उपोषण करण्यात आले होते. परंतु, शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे सदर मागणीकडे लक्ष वेधण्याच्या हेतूने गुरूवारी सर्वपक्षीय रॅलीचे आयोजन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. आमदार बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अहतेशाम अली, पं. स. सभापती रोहिणी देवतळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोयर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंभुनाथ वरघणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन मत्ते, राकाँचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास नेरकर, अ‍ॅड. रोशन नकवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रॅलीच्या सुरुवातीला प्रमुख वक्त्यांनी जिल्हा निर्मितीच्या मागणी उचलून धरली. आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गाने ही रॅली काढण्यात आली. प्रचंड घोषणा देत रॅली तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचली. उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. रॅलीमध्ये जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण धनवलकर, नगरसेवक राजू महाजन, प्रवीण सुराणा, मनीष जेठाणी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, बाबा भागडे, डॉ. हेमंत खापणे, लक्ष्मण गमे, डॉ. सागर वझे, समीर बारई, अ‍ॅड. विनोद जानवे, दादा जयस्वाल, अ‍ॅड. विजय पावडे आदींसह हजारो महिला व पुरुष सहभागी झाले होते. रॅलीच्या माध्यमातून मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, खासदार यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व अधिकाºयांकडे निवेदन पाठविण्यात आले.

Web Title: All-party rally in the city to demand the creation of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.