शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वायू प्रदूषण धोक्याच्या पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:11 IST

देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश आहे. येथील प्रदूषणाबाबत नेहमीच चर्चा होते. परंतु, प्रदूषण नेमके कसे व किती आहे, त्याचा मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काय परिणाम होतो, ..

ठळक मुद्देमानवी आरोग्यावर घातक परिणाम : चंद्रपूर विभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळे मिटूनच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश आहे. येथील प्रदूषणाबाबत नेहमीच चर्चा होते. परंतु, प्रदूषण नेमके कसे व किती आहे, त्याचा मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काय परिणाम होतो, याबाबत कुणालाही फारशी माहिती नाही. त्यामुळे नागरिकही याकडे दुर्लक्ष करतात. मात्र चंद्रपुरातील जलबिरादरी संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणातून चंद्रपुरातील वायू प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे श्वास घेणेही धोक्याचे बनले असून भयंकर परिणाम जाणवणार आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग आहेत. या उद्योगातून होणारे वायू प्रदूषण नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी चंद्रपुरात प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे. मात्र ‘आॅल इज वेल’ म्हणत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उद्योगांना धूर ओखण्यासाठी परवानगी देत असल्याने उद्योगांचे वायू प्रदूषण चंद्रपूरकरांच्या जीवावर उठले आहे. जलबिरादरी संस्थेने तुकूम येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील औद्योगिक रसायनशास्त्राचे प्रा. डॉ. डी. टी. कोसे यांच्या मार्फत वायू प्रदूषणाचा एक सर्वेक्षण अहवाल तयार केला. या अहवालातील प्रदूषणाच्या नोंदणीची आकडेवारी समोर आल्यानंतर चंद्रपुरातील वायू प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडल्याचे पुढे आले आहे.सर्वसामान्यपणे साध्या डोळ्यांना वाहनांमधून किंवा कारखान्यातून जो धूर निघताना दिसतो किंवा छोटे-छोटे धुळीचे कण दिसतात, त्यांनाच आपण हवेचे प्रदूषण असे म्हणतो. परंतु, साध्या डोळ्यांना न दिसणाऱ्या सुक्ष्म व अतिसुक्ष्म घन तसेच द्रव्य पदार्थाबद्दल नागरिकांना माहिती नाही. डोळ्यांना न दिसणाºया परंतु वातावरणाला तीव्र स्वरूपात प्रदूषित करून आजारांना निमंत्रण देणारे वायू प्रदूषण पी. एम. २.५ पेक्षा जास्त असू नये. परंतु चंद्रपूर शहरातील वायू प्रदूषणाची नोंद घेतली असता, दररोजचे वायू प्रदूषण पी. एम. १५० ते २५० पर्यंत गेले आहे. यावरून चंद्रपुरातील हवा मानवी जीवनास अत्यंत धोकादायक बनली आहे. शहरात पीएम २.५ चे प्रमाण किती आहे, याबाबत ४ ते १२ मार्च दरम्यानच्या काळात घेतलेल्या आकडेवारीवरून वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.मानवी केसांच्या जाडीपेक्षाही बारीक कणपी. एम. २.५ म्हणजे वातावरणात असलेले धुलीकरण ज्यांचा आकार २.५ मायक्रॉन आहे. मानवी केसांची जाडी साधारणत: ५० ते ७० मायक्रॉन असते. मात्र मानवी केसांच्या जाडीपेक्षा २० ते २८ पटीने कमी असलेल्या धुलीकनांना पी. एम. २.५ असे म्हटले जाते. यामध्ये घन आणि द्रव्य रूपातील कार्बोनिक व अकाबोर्निक पदार्थ तसेच धातूंचे अतिसूक्ष्म कण इत्यादींचा समावेश होतो. या घटकांचे प्रमाण जास्त झाल्यास ते हवा प्रदूषणााठी कारणीभूत ठरतात.कर्करोग होण्याची अधिक शक्यताशहरी भागामध्ये व त्यातही औद्योगिक शहरी भागामध्ये पीएम २.५ चे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा फारच जास्त असते. कोळसा जाळणे, विविध प्रकारचे इंधन, नैसर्गिक गॅस, फ्लाय अ‍ॅशचे उत्सर्जन आणि विविध औद्योगिक प्रक्रिया हे पीएम २.५ चे प्रमुख स्त्रोत आहेत. यामध्ये आयरन आक्साईड्स, कॅल्शियम आक्साईड्स, लीड हॅलाईड्स, अमोनियम सल्फेट्स, कॅल्शियम अक्साईडस तसेच पालीसायक्लिक अ‍ॅरोमॅटीक हायड्रोकार्बन हे कर्करोग निर्माण करणारे घटक असतात. त्यामुळे पीएम २.५ चे प्रमाण मर्यादित पातळी असणे गरजेचे आहे.