आयुष्याच्या सायंकाळी हवा आधार
By Admin | Updated: September 30, 2014 23:33 IST2014-09-30T23:33:51+5:302014-09-30T23:33:51+5:30
आयुष्याची संध्याकाळ सुख-समाधानाने जावी, अशी प्र्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठीच प्रत्येकजण सारखा धडपडत असतो. मान-सन्मान, प्र्रतिष्ठा आणि धन या सर्व गोष्टींची पुंजी जमा करताना अख्खे आयुष्य घालवतोे.

आयुष्याच्या सायंकाळी हवा आधार
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
आयुष्याची संध्याकाळ सुख-समाधानाने जावी, अशी प्र्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठीच प्रत्येकजण सारखा धडपडत असतो. मान-सन्मान, प्र्रतिष्ठा आणि धन या सर्व गोष्टींची पुंजी जमा करताना अख्खे आयुष्य घालवतोे. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी काही वृद्धांच्या नशीबी हाल, अपेष्टा तसेच अपमानित जीवन जगण्याची वेळ येते. तेव्हा मात्र जीवनाचा प्र्रत्येक क्षण आठवतो. आयुष्यात जे कमावले त्याची उतारवयात काहीच किमत नसल्याचे त्यांना जाणवते. प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठीही कुणीच नसते. वृद्धापकाळात आधार मिळावा यासाठी प्रत्येकांना आशा आहे. मात्र त्यांच्या आशेवर अनेकवेळा पाणी फेरल्या जाते. आता मात्र येथील ज्येष्ठ नागरिक संघाने आपल्या समवयस्कांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. एवढेच नाही तर, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यातही सहभाग घेऊन स्वत:चा ‘आधार’ शोधण्यासाठी धडपड सुरु केली आहे.
ज्येष्ठांना समाधानाने दोन शब्द बोलता यावे, त्यांचा विळंगुळा व्हावा यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक संघाने काम सुरु केले आहे. या संघाचे अध्यक्ष रामदास रायपुरे हे आहे. विशेष म्हणजे, राज्यात या संघाचे काम वाखान्याजोगे असून शहरात तब्बल ५ हजारावर सदस्यांची नोंदणी झाली आहे. ज्येष्ठांच्या समस्यांवर येथे विचारमंथन केले जाते. अनेकवेळा मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहे. एवढेच नाही तर, येथील ज्येष्ठ नागरिक संघाने सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही आपले योगदान देत आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि श्रमशक्तीचा वापर भावी पिढीला आजही प्रेरणादायी ठर
त आहे. वृद्धांच्या अनेक समस्या आहे मात्र त्या सोडविण्यासाठी पाहिजे तसे लक्ष देण्यासाठी शासन, समाज तसेच कुटुंबाकडेही वेळ नसल्याचे सध्याचे चित्र आहे. भारतातील ज्येष्ठ नागरिकांपैकी ६० टक्के ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. यातील बहुतांश ज्येष्ठांना सामाजिक व आरोग्य विषयक सुरक्षितता नाही. ४० टक्के ज्येष्ठांना घरात मानसिक त्रास दिला जातो. तर, १७ टक्के ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. परिणामी काहींना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. शासनातर्फे विविध योजनेंतर्गत मदत दिली जात असली तरी ती त्यांना पोहचतेच असे नाही. त्यामुळे ठोस धोरण आखून त्यांना आधार देणे गरजेचे आहे.