शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलाचा विवाह लावून परत येताना आईचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 15:26 IST

Chandrapur : आदल्या दिवशी झाला होता मोठ्या मुलाचा विवाह

लोकमत न्यूज नेटवर्कसावली: गडचिरोली जिल्ह्यातील रांगीनजीक निमगाव येथे लहान मुलाचा विवाह लावून दुचाकीने सावलीकडे येताना पिकअप वाहनाने धडक दिल्याने नवरदेवाच्या आईचा मृत्यू, तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना २ एप्रिल रोजी गुरुवारी सायंकाळी ७:४५ वाजता गडचिरोलीतील कारगिल चौकात घडली. रेखा नामदेव राऊत (४४), असे मृतक महिलेचे नाव आहे, तर दुचाकीस्वार बंडू भलवे (२७, रा. सावली) हा गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे आदल्या दिवशी मोठ्या मुलाचा विवाह झाला होता.

सावली येथील नामदेव राऊत यांच्या दोन मुलांचे लग्न होते. अमित राऊत नामक मोठ्या मुलाचे लग्न १ मे बुधवारी सावली येथे पार पडले, तर २ मे रोजी लहान मुलगा अविनाश राऊत याचे लग्न रांगीनजीकच्या निमगाव येथे होते. हे लग्नकार्य आटोपून नवरदेवाची आई रेखा राऊत ही दुचाकीचालक बंडू भलवे यांच्यासोबत गडचिरोलीमार्गे सावलीकडे येत होती. दरम्यान, कारगिल चौकात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत रेखा राऊत यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार बंडू भलवे यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी बंडू भलवे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

स्वागत सभारंभाच्या दिवशीच आईवर अंत्यसंस्कार अमित आणि अविनाश या दोन भावंडांच्या विवाहानंतर शुक्रवारी स्वागत सभारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आई रेखा राऊत यांच्यासोबत कुटुंबातील सर्वच मंडळी आनंदात होती. मात्र, अपघाताने आईला हिरावून घेतले. आजचा स्वागतसभारंभ रद्द करून भावंडांनी शोकाकुल वातावरणात चारगाव नदी घाटावर आईला अखेरचा निरोप दिला. यावेळी नातेवाइकांसह शहरातील नागरिकांनाही अश्रू आवरता आले नाहीत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू