‘पोलीस’ लिहिलेल्या चारचाकी वाहनाने अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST2022-03-13T05:00:00+5:302022-03-13T05:00:36+5:30
तालुक्यातील दूधवाही येथे साळ्याच्या लग्नाचा कार्यक्रम आटोपून ब्रह्मपुरी येथे येत असताना तक्रारकर्ता प्रकाश लोखंडे ब्रह्मपुरी हे परिवारासह परत येत होते. परत येताना समोर सासरे (क्र. एम. एच. ३४ पी. २६३८ ) दुचाकीने येत होते. तर जावई प्रकाश मागे होते. दुर्गा मंगल कार्यालयाजवळ येताच उभ्या चारचाकी हुंडाई (क्र.एम. एच. १२ पी. टी. ७४०६ ) च्या चालकाने अचानक दार उघडल्याने दुचाकी दाराला धडकली. यात देवीदास लिंगायत रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.

‘पोलीस’ लिहिलेल्या चारचाकी वाहनाने अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : रस्त्याच्या कडेला उभ्या चारचाकी चालकाने अचानक दार उघडल्याने मागून येणारी दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुर्गा मंगल कार्यालयाजवळ घडली. देवीदास लिंगायत, रा. मांगली असे जखमीचे नाव आहे. सदर चारचाकी वाहनात ‘पोलीस’ लिहिलेली पाटी असल्याने घटनास्थळी चर्चेला उधाण आले होते. पोलिसांनी उशिरा घटनेची दखल घेत एफ.आय.आर. दाखल केला.
तालुक्यातील दूधवाही येथे साळ्याच्या लग्नाचा कार्यक्रम आटोपून ब्रह्मपुरी येथे येत असताना तक्रारकर्ता प्रकाश लोखंडे ब्रह्मपुरी हे परिवारासह परत येत होते. परत येताना समोर सासरे (क्र. एम. एच. ३४ पी. २६३८ ) दुचाकीने येत होते. तर जावई प्रकाश मागे होते. दुर्गा मंगल कार्यालयाजवळ येताच उभ्या चारचाकी हुंडाई (क्र.एम. एच. १२ पी. टी. ७४०६ ) च्या चालकाने अचानक दार उघडल्याने दुचाकी दाराला धडकली. यात देवीदास लिंगायत रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.
‘पोलीस’ नावाची पाटी संशयास्पद
बाहेर गावाहून ब्रह्मपुरी येथे आलेल्या चारचाकी वाहनात ‘पोलीस’ असे इंग्रजीत लिहिलेली पाटी समोरील काचाच्या आत ठेवण्यात आली होती. त्यामुळे हे वाहन पोलीस विभागाचे असेल असे नागरिकांना वाटले. मात्र, एम. एच. १२ सिरीज असलेल्या वाहनाची पासिंग पुणे येथील आहे. अपघात होताच चालकाने उपस्थितांशी अरेरावीची भाषा वापरून माझे वडील पी. एस. आय. असल्याचे सांगितले. सदर वाहनावरील पोलीस नावाची पाटी संशयास्पद असल्याचे दिसून आले.