डीआरएम यांच्या दौऱ्यास निघालेल्या स्पेशल गाडीने वाघाचा मृत्यू
By राजेश भोजेकर | Updated: November 27, 2023 12:51 IST2023-11-27T12:47:46+5:302023-11-27T12:51:02+5:30
नागभीड रेल्वे स्थानकालगतच्या किटाळी मेंढा गावजवळील घटना

डीआरएम यांच्या दौऱ्यास निघालेल्या स्पेशल गाडीने वाघाचा मृत्यू
चंद्रपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे बिलासपूर झोनचे जनरल मॅनेजर यांचा १ डिसेंबरला गोंदिया - चांदाफोर्ट रेल्वे मार्गाचा दौरा करणार नियोजित आहे. याची पुर्व तयारी सुरू आहे. या संदर्भात आढावा घेण्यासाठी डीआरआरएम नमिता त्रिपाठी यांचा सोमवारी दौरा होता.
डीआरआरएम त्रिपाठी यांना घेण्यासाठी गोंदियावरुन चांदाफोर्टसाठी पहाटे स्पेशल गाडी निघाली. या स्पेशल गाडीने नागभीडजवळील किटाडी मेंढाजवळ पहाटे ३ वाजताच्या सुमारास रेल्वे मार्गावर आलेल्या वाघाला धडक दिली. यात वाघाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच ब्रह्मपुरी वन विभागातील नागभीड वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.