धावत्या दुचाकीसमोर आला रानडुकरांचा कळप; एकाचा मृत्यू, एक गंभीर
By परिमल डोहणे | Updated: June 6, 2023 19:03 IST2023-06-06T19:03:24+5:302023-06-06T19:03:44+5:30
Chandrapur News पोंभूर्णा येथून कामकाज आटोपून दुचाकीने बोर्डा दीक्षित येथे निघालेल्या दुचाकीस्वाराला डुकरांनी धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला.

धावत्या दुचाकीसमोर आला रानडुकरांचा कळप; एकाचा मृत्यू, एक गंभीर
परिमल डोहणे
चंद्रपूर : पोंभूर्णा येथून कामकाज आटोपून दुचाकीने बोर्डा दीक्षित येथे निघालेल्या दुचाकीस्वाराला डुकरांनी धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना ५ जून रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास पोंभुर्णा-कसरगट्टा मार्गावर घडली. कालिदास पेंदोर (४०), रा. बोर्डा दीक्षित) असे मृतकाचे, तर गोविंदा कुमरे (४५, रा. बोर्डा दीक्षित) असे गंभीर इसमाचे नाव आहे.
कालिदास पेंदोर व गोविंदा कुमरे हे दोघे सोमवारी पोंभूर्णा येथील कामकाज आटोपून रात्री ९ च्या दरम्यान दुचाकीने आपल्या गावाकडे जात होते. पोंभूर्णा-कसरगट्टा रोडवर रात्री ९ वाजेदरम्यान रानडुकरांचा कळप आडवा आला. त्यात दुचाकीस्वाराला रानडुकरांची धडक बसली. झालेल्या अपघातात कालिदास पेंदोर याचा मृत्यू झाला, तर गोविंदा कुमरे हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीवर उपचार सुरू आहे. पुढील तपास पोंभूर्णा पोलिस करीत आहेत.