शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्या नावाने 'ते' करतात दरवर्षी अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 12:38 IST

चंद्रपुरातील ८६ वर्षीय ज्येष्ठ कार्यकर्त्याची धडपड

चंद्रपूर : येथील काँग्रेससोबत एकनिष्ठ असलेले ८६ वर्षीय कार्यकर्ते केशव आवारी हे मागील अनेक वर्षांपासून शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात राहुल गांधी पंतप्रधान व्हावे यासाठी अभिषेक करीत आहेत. वाढत्या वयामुळे ते आता शेगाव येथे जाऊ शकत नसले तरी ते दरवर्षी मनी ऑर्डर आणि शेगाव येथील मंदिर प्रशासनाला पत्र पाठवून राहुल गांधी यांच्या नावाने अभिषेक करण्याची विनंती करतात. यावर्षीही त्यांनी ही विनंती केली आहे.

सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान विदर्भात आहेत. त्यामुळे एकदा त्यांना भेटण्याची इच्छा आवारी यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेससोबत असलेल्या निष्ठेतून यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी यांच्यासोबत केशव आवारी यांनी आजवर अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. या सर्व पत्रांचे उत्तरसुद्धा त्यांना आले आहे. विशेष म्हणजे, आलेले प्रत्येक पत्र त्यांनी आजपर्यंत जपून ठेवले आहे.

गजानन महाराजांचे भक्त असलेले आवारी हे जन्मताच दिव्यांग आहेत. असे असले तरी राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी ते मागील अनेक वर्षांपासून न चुकता शेगाव येथे जाऊन अभिषेक करतात. मागील काही वर्षांत त्यांनी मनिऑर्डरद्वारे अभिषेक केला आहे. यावर्षी मंदिर प्रशासनाकडून मिळालेला प्रसाद तसेच दुपट्टा राहुल गांधी यांना देण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र वाढत्या वयामुळे त्यांची भेट होणे कठीण आहे. असे असले तरी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती ओबीसी विभागाचे राज्य उपाध्यक्ष उमाकांत धांडे यासाठी प्रयत्न करीत आहेत.

युवक काँग्रेसपासून जुळले पक्षात

केशव आवारी हे युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाशी जुळले. अक्षर सुधारक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी चालविलेल्या वर्गातून अनेक जणांचे अक्षर सुबक आणि वळणदार झाले आहे. शेगाव देवस्थानमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळेतदेखील त्यांनी विद्यार्थ्यांकरिता अक्षर सुधार वर्ग घेतले आहेत.

आजही खादीचेच कपडे

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, साध्वी प्रीतीसुधाजी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर खादी कपड्याशिवाय दुसरे कोणतेही कपडे वापरले नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSocialसामाजिक