सहा नगरपंचायत निवडणुकीतून ७८ जणांचे नामांकन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 15:50 IST2021-12-09T15:48:51+5:302021-12-09T15:50:38+5:30
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीमध्ये ८२ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी ४५० जणांनी अर्ज दाखल केले होेते. बुधवारी झालेल्या अर्ज छाननीमध्ये ७८ अर्ज बाद झाले आहे.

सहा नगरपंचायत निवडणुकीतून ७८ जणांचे नामांकन रद्द
चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीमध्ये ८२ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी ४५० जणांनी अर्ज दाखल केले होेते. बुधवारी झालेल्या अर्ज छाननीमध्ये ७८ अर्ज बाद झाले आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठीही अनेकांची निराशा झाली आहे.
सावली, गोंडपिपरी, पोंभूर्णा, कोरपना, सिंदेवाही आणि जिवती या नगरपंचायतीसाठी ही निवडणूक होणार आहे. सर्वोच्च न्यायलायाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे ओबीसी प्रवर्गातील अर्जांचा यामध्ये विचार करण्यात आला नाही. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरापर्यंत उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू होती.
सावलीमध्ये ४७ अर्ज करण्यात आले होते. यातील १६ अवैध ठरले. पोंभूर्णामध्ये ६७ जणांच्या अर्जापैकी ६१ पात्र तर ६ रद्द झाले, कोरपनामध्ये ५७ अर्जापैकी ३५ अर्ज पात्र झाले असून २२ अवैध ठरले आहे. जिवतीमध्ये ६६ नामांकन दाखल करण्यात आले होते. यातील ५२ अर्ज पात्र झाले तर १४ अर्ज अपात्र ठरले. सिंदेवाहीमध्ये ९३ अर्जापैकी १३ अर्ज अपात्र ठरले. दरम्यान, गोंडपिपरीमध्ये १४ प्रभागासाठी ७८ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील ६ अर्ज अपात्र ठरले.
सध्याचे पक्षीय बलाबल
गोंडपिपरी- काँग्रेस ३, भाजप ६, शिवसेना ०१, अपक्ष ७
सावली- काँग्रेस १०, भाजप ०, राष्ट्रवादी ०५, बसप१, अपक्ष ०१(काँग्रेस प्रवेश)
पोंभूर्णा- भाजप १०, काँग्रेस०५, अपक्ष १(काँग्रेस), अपक्ष १(भाजप)
सिंदेवाही- भाजप ११, काँग्रेस ०६
कोरपना-काँग्रेस १४, शेतकरी संघटना ०१, राष्ट्रवादी १, अपक्ष १
जिवती- राष्ट्रवादी ०५, काँग्रेस०१, भाजप ०३