शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

डेंग्यूचे ६८, तर टायफाईडचे ७१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:47 PM

चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय विविध साथीच्या आजाराच्या रूग्णांनी फुल्ल झाले आहेत. यामध्ये डेंग्यूचे ६८ रूग्ण पॉझिटिव्ह तर टायफाईडचे ७१ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. हा सरकारी आकडा असून खासगी रूग्णालयात सुद्धा अनेक डेंग्यू पॉझिटिव्ह रूग्ण असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ४५० खाटांची संख्या असलेल्या या रूग्णालयात आज ७५५ रूग्ण भरती असल्याने एका खाटेवर दोन, तीन तर अनेक वॉर्डात रूग्ण जमिनीवर उपचार घेत आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय फुल्ल : एका खाटेवर दोन रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय विविध साथीच्या आजाराच्या रूग्णांनी फुल्ल झाले आहेत. यामध्ये डेंग्यूचे ६८ रूग्ण पॉझिटिव्ह तर टायफाईडचे ७१ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. हा सरकारी आकडा असून खासगी रूग्णालयात सुद्धा अनेक डेंग्यू पॉझिटिव्ह रूग्ण असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ४५० खाटांची संख्या असलेल्या या रूग्णालयात आज ७५५ रूग्ण भरती असल्याने एका खाटेवर दोन, तीन तर अनेक वॉर्डात रूग्ण जमिनीवर उपचार घेत आहे.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साथीचे रोग, डेंग्यू, टायफाईड, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या अनेक आजारांनी थैमान घातले आहे. त्यामुळे गोरगरिब जनता वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहे. साथीच्या आजारामुळे ४५० खाटा असलेल्या रूग्णालयात ७५५ च्या वर रूग्ण भरती झाले असून एका खाटेवर दोन रूग्ण उपचार घेत आहे. तर अनेक रूग्ण जमिनीवर गादी टाकून उपचार घेत आहे. डेंगूने जिल्ह्यात पाय पसरले असून डेंग्यू सारख्या आजाराने तरूण अभियंता निखल बावीस्कर व अन्य एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर ९० च्यावर संशयित डेंग्यूच्या रूग्णांची नोंद घेण्यात आलेली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात डेंग्यूचे ६८ रूग्ण पॉझिटिव्ह तर टायफाईडचे ७१ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामध्ये जुलै मध्ये डेंग्यूचे ६ रूग्ण, आॅगस्टमध्ये ४१ रूग्ण तर १६ सप्टेंबर अखेर २१ रूग्ण पॉझिटिव्ह असे एकूण ६८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर टायफाईडमध्ये एप्रिलमध्ये ४, मे मध्ये ८, जून मध्ये ६, जुलै १४, आॅगस्ट १५, सप्टेंबर २४ असे एकूण ७१ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. या सर्व रूग्णांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. हा आकडा सरकारी रूग्णालयातील असल्याने खाजगी रूग्णालयामध्ये सुद्धा डेंग्यू व टायफाईड रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे